नवी दिल्ली | जगभरात कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाच्या या वाढत्या आकड्यांमुळे मोठी समस्या उद्भवू शकते, कारणअनेक देशांमध्ये कोरोना चाचणी दरात घट झाली आहे. अशा परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगभरातील देशांना या विषाणूपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या एका महिन्यापासून जगभरात कोरोना रूग्ण संख्येमध्ये घट झाली आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आशिया आणि चीनमधील जिलिन प्रांतात कोविडची वाढती प्रकरणे पाहता लॉकडाऊन लागू करावा लागला आहे, असं WHO ने म्हटलंय.
अनेक देशांमध्ये चाचणी नसतानाही कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. याचा अर्थ असा होतो की जी प्रकरणे पाहिली जात आहेत ती खूपच कमी आहेत. WHO अधिकाऱ्यांनी सांगितलं की काही देशांमध्ये लसीकरणाचा कमी दर हे देखील कोविड प्रकरणांमध्ये वाढ होण्याचं कारण आहे.
मागील आठवड्याच्या तुलनेत जागतिक स्तरावर नवीन संसर्गामध्ये 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 7-13 मार्च दरम्यान, 1.1 कोटी नवीन प्रकरणे आणि 43,000 हून अधिक मृत्यूची नोंद झाली.
जानेवारीअखेर ही पहिलीच वाढ आहे. डब्ल्यूएचओच्या पश्चिम पॅसिफिकमध्ये प्रकरणांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे, ज्यामध्ये दक्षिण कोरिया आणि चीनचा समावेश आहे.
इथे नवीन कोविड प्रकरणांमध्ये 25 टक्के आणि मृत्यूंमध्ये 27 टक्के वाढ झाली आहे. आफ्रिकेतही नवीन प्रकरणांमध्ये 12 टक्के आणि मृत्यूंमध्ये 14 टक्के वाढ झाली आहे.
युरोपमध्ये प्रकरणांमध्ये 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे, परंतु मृत्यूमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. त्यात पूर्व भूमध्य प्रदेशाचाही समावेश होतो.
महत्त्वाच्या बातम्या-
अत्यंत महत्त्वाची बातमी; LPG सिलेंडरच्या दरात झाला मोठा बदल
बालात्काराचा आरोप असलेल्या शिवसेना नेत्याचे खळबळजनक कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल!
“‘द कश्मीर फाइल्स’चं काय, ‘ठाकरे’ सिनेमाही आम्ही महाराष्ट्रात टॅक्स फ्री केला नव्हता”