WHO च्या दाव्याने जगाचं टेन्शन वाढलं; लहान मुलांमध्ये आढळली ‘हिपॅटायटीस’ची प्रकरणे

नवी दिल्ली | WHO ने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार 21 एप्रिलपर्यंत WHO युरोपियन प्रदेशातील 11 देशांमध्ये आणि अमेरिकेत हिपॅटायटीसची प्रकरण आढळली आहेत.

अज्ञात उत्पत्तीच्या तीव्र हिपॅटायटीसची किमान 170 प्रकरणे नोंदवली गेल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. त्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

एक महिन्यापासून ते 16 वर्षापर्यंत वयोगटातील तब्बल 17 प्रकरणे समोर आली आहेत. त्यातील जवळजवळ 10 टक्के लहान मुलांना यकृत प्रत्यारोपनाची गरज आहे.

पाश्चिमात्य देशात मुलांमध्ये एडेनोव्हायरस संसर्गामध्ये वाढ झाली आहे, परंतु यापैकी कोणत्याही प्रकरणात तीव्र व्हायरल हिपॅटायटीसचा संसर्ग नाही, असं आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं आहे.

हिपॅटायटीस हा विषाणूजन्य संसर्गामुळे होणारा यकृताचा आजार आहे. या आजारात यकृतामध्ये जळजळ होते. हिपॅटायटीसमध्ये 5 प्रकारचे विषाणू असतात.

दरम्यान, कोरोनाचं संकट कमी होत असताना आता हिपॅटायटीसची प्रकरणे आढल्याने आता ब्रिटनची आरोग्य व्यवस्था कामाला लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

फायर चंद्रभागा आजींची उद्धव ठाकरेंनी सहकुटूंब घेतली भेट; दिलं ‘हे’ खास गिफ्ट

बँकेची कामं आताच आटोपून घ्या! मे महिन्यात बँका तब्बल 13 दिवस बंद राहणार; पाहा तारखा

“विराटने चौथ्या आणि पाचव्या नंबरवर खेळावं मग…”, माजी खेळाडूचा किंग कोहलीला सल्ला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांची भाजपवर जोरदार टीका, म्हणाले…

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट गरजेची’, केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य