मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्लाबोल केला आहे. त्यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर घणाघात केला आहे.
संजय राऊतांनी यावेळी सोमय्यांचा उल्लेख थेट दलाल, असं केलं आहे. तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात, असं म्हणत त्यांनी सोमय्यांवर टीका केली आहे.
मी ज्या ज्या वेळी म्हणालो की महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, त्या त्या वेळी माझ्या नातेवाईकांवर, कुटुंबियांवर छाडी पडल्या, असं राऊत म्हणाले.
माझ्या मुलांना फोन करून धमक्या दिल्या की तुमच्या वडिलांना उद्या पोलीस घेऊन जातील. इतकं घाणेरडं राजकारण भाजपाकडून सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
महाराष्ट्र गांडूची औलाद नाही आणि शिवसेना अजिबात घाबरणार नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. केंद्रीय तपास हल्ले करत आहेत, हे देशावरचे संकंट असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘शेती इकायची नसती वो, राखायची असती’; प्रविण तरडेंनी शेअर केला वडिलांसोबतचा व्हिडीओ
निवडणुकीआधी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा; तब्बल 46 वर्षांनंतर ‘हात’ सोडला
मुंबईत ईडीची मोठी कारवाई! कुख्यात गुंड दाऊदच्या संबंधितांवर छापेमारी
‘या’ कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 10 महिन्यांत गुंतवणुकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे झाले 66 लाख