मुंबई| आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी-धुमाळ. हेमांगीने मराठी-हिंदी मालिका, नाटक, आणि चित्रपट अशा या तिन्ही माध्यमांमध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
हेमांगी कवी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच तिच्या फॅन्ससोबत संवाद साधत असते. तिने नुकताच तिच्या व्हिडिओवर एका बाईने दिलेल्या कमेंटचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला असून त्याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
बॉलिवूड असुदे किंवा मराठी चित्रपटसृष्टी कलाकरांना नेहमीच चाहत्यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. कलाकारांनी एखादा फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला की त्यावर बऱ्याच नकारात्मक कमेंट आपल्याला पाहायला मिळतात. असाच एक ट्रोलिंगचा अनुभव मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीला आला आहे.
हेमांगीलाही नुकतंच ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. या संदर्भातला एक फोटो तिने फेसबुकवर शेअर केला आहे. याद्वारे तिने ट्रोलरला सडेतोड शब्दांमध्ये उत्तर दिले आहे.
हेमांगीने फेसबुकवर शेअर केलेल्या फोटोत तिचा फोटो दिसत असून यावर एका महिला चाहतीने कमेंट करत तिला ट्रोल केले आहे. हेमांगीने याचा स्क्रिनशॉट फोटो शेअर केला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये दिसतंय की एका चाहतीने हेमांगीच्या पोस्टवर कमेंट करताना म्हणतेय की, ‘एक्सप्रेशन आणि डान्स वगैरे ठीक आहे. पण, एवढी गचाळ का राहतेस. जरा टिप टॉप रहा म्हणजे आम्हाला बघवेल व्हिडियो प्लीज’.
हेमांगीने एक स्क्रीनशॉर्ट शेअर करत लिहिले आहे की, या फोटोतली comment वाचा! ती ही एका स्त्री ने लिहिलीये! शिकलेली, बऱ्या घरातली बाई! नक्की कुठे चाललोय आपण?vआता या comments चा भडीमार होणार… ignore it, social media आहे हे, लोकं बोलणारच वगैरे वगैरे! मला एवढंच लक्षात आणून द्यायचंय की आपली मानसिकता काय होत चाललीये! ती जर चूक असले तर ती थांबवावी की नाही हे ज्याने त्याने ठरवावे!
ही पोस्ट करत हेमांगीने चाहत्यांच्या मानसिकतेवर भाष्य केलं आहे. या पोस्टमधून हेमांगीने अनेकांच्या डोळ्यात अंजन टाकण्याचं काम केलं आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टचं कौतुक केलं आहे. तर अनेकांनी कमेंट करणाऱ्या स्त्रीला दोषी ठरवत हेमांगीला आहे तसंच राहण्याचा सल्ला दिला आहे.
कामाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास हेमांगी स्टार भारतवरील ‘तेरी लाडली मै’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करताना दिसत आहे. स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेची कथा प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे. या मालिकेला मिळणारा प्रतिसाद पाहून हीच मालिका आता हिंदीमध्ये आली आहे. ‘तेरी लाडली मै’ या नावाने ही मालिका सुरु झाली आहे. या मालिकेत हेमांगी उर्मिलाच्या भूमिकेत काम करतेय.
हेमांगी अभिनेत्रीसोबत एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. तिने ‘एका पेक्षा एक- अप्सरा आली’ या कार्यक्रमात तिच्या नृत्याची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे.
https://www.facebook.com/hemangii.kavidhumal/posts/4409247769094818
महत्वाच्या बातम्या –
‘तुझं गाणं कोण ऐकत, तू नाकातून गातो’, असं…
ख्रिस गेलचं ‘हे’ गाणं सोशल मिडीयावर तूफान…
कोरोनामुळे अशी झाली कतरिना कैफची अवस्था, फोटो शेअर करत…