महाराष्ट्र मुंबई

या कारणामुळे चित्रा वाघ यांची ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ला सोडचिठ्ठी???

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेल्या चित्रा वाघ भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामागील कारणाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ सरकारी नोकरीत होते. मात्र २०१६ साली त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप झाला. ४ लाख रुपयांची लाच घेताना ते पकडले गेले. तेव्हापासून चित्रा वाघ बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर चित्रा वाघ चांगल्याच प्रकाशझोतात आल्या होत्या. राष्ट्रवादीने त्यांच्यावर महिला प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सुद्धा टाकली होती. मात्र पतीवर ट्रॅप होताच त्या शांत झालेल्या पहायला मिळाल्या. 

आपले पती या प्रकरणातून सहीसलामत सुटावेत हे चित्रा वाघ यांचे प्रयत्न आहेत आणि त्यासाठी त्यांना भाजपची मदत लागेल. त्यामुळेच चित्रा वाघ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 

दरम्यान, काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत असलेले आमदार प्रसाद लाड मध्यस्थाची भूमिका पार पाडत असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी काळात आणखी मोठे धक्के बसण्याची शक्यता असून अनेक मोठे नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. 

चित्रा वाघ यांचा राजीनामा-

महत्वाच्या बातम्या-

-राणा जगजितसिंह पवारांना धक्का देणार??; राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार!

-राष्ट्रवादीला खिंडार; चित्रा वाघ ‘या’ दिवशी भाजपात प्रवेश करणार???

-सत्तेत आलो तर भूमिपुत्रांना नोकरीत 75% आरक्षण देणार; अजित पवारांचं मोठं आश्वासन

-मोदी लाटेत निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश???

-सचिन अहिरांच्या मनगटावर ‘शिवबंधन’; शिवसेनेचे सुनील शिंदे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

 

IMPIMP