उद्योगपती रतन टाटांनी लग्न का केलं नाही?; वाचा स्वतः रतन टाटांनी सांगितलेलं कारण…

मुंबई |  देशातील यशस्वी उद्योजकांच्या यादीत श्री रतन टाटा यांचं नाव घेतलं जातं. रतन टाटा ‘बस्स नाम ही काफी है’, असं म्हटलं तर काहीच चुकीचं ठरणार नाही.  कारण ते एक यशस्वी उद्योजक आहेत. हे पाहता सर्वांना त्यांचा अभिमान वाटणे सहाजिक आहे.

सोशल मिडिया म्हणू नका, किंवा उद्योग क्षेत्रातील प्रगती होण्याच्या दृष्टीने काम करणारे असंख्य लोक आहेत, पण त्यात रतन टाटा हे एक नाव आहे. अविवाहीत रतन टाटांनी एक मुलाखतीत स्वतः आपल्या प्रेमाविषयी मनमोकळेपणाने सांगितली आहे, पण त्यांनी त्यांच्या जीवनात कोणावरच प्रेम केलं नाही, असं काही नाही.

रतन टाटांनी त्याच्या वैयक्तिक आयुष्यबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या आयुष्यात ते एकदा नाही, तर चार वेळा प्रेमात पडले होते. मात्र, रतन टाटांच्या आयुष्यात कठीण काळ येत राहीले, या काळात प्रेमाचा धागा टिकला नाही, असे ते म्हणाले आहेत.

आपल्या प्रेमाविषयी बोलताना रतन टाटा म्हणाले, जेव्हा मी अमेरिकेत काम करत होतो तेव्हा मी प्रेमाविषयी सर्वात जास्त गंभीर झालो होतो. केवळ मी तेव्हा भारतात परत आल्याने आम्ही लग्न करु शकलो नाही. रतन टाटा यांच्या प्रेयसीला भारतात यायचं नव्हतं. त्या काळात भारत आणि चीनचं युद्ध सुरु होतं.

रतन टाटा यांच्या प्रेयसीने अमेरिकेत दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं. यानंतर रतन टाटा यांनी पुन्हा कधीच लग्नाविषयी विचार केला नाही. ते चार वेळी विवाहबंधनात अडकता अडकता राहिले. टाटा समुहाला उंच शिखरावर नेताना आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. रतन टाटा म्हणाले, मलाही प्रेम झालं होतं, मात्र मला माझ्या प्रेमाला लग्नापर्यंत नेता आलं नाही.

लग्न न करण्याचा माझा हा निर्णय योग्य ठरला आहे. मी लग्न केलं असतं तर आताची परिस्थिती काही अधिक गुंतागुंतीची राहिली असती. जर तुम्ही मला विचारलं की तुम्ही कधी प्रेम केलं नाही का? तर मी हेच सांगेल की, मी चार वेळा प्रेम करुन लग्नावर गंभीर विचार केला. मात्र, प्रत्येकवेळी मी कोणत्या ना कोणत्या कारणाने मागे हटलो. आपल्या जीवनाविषयी सांगताना काम म्हणजे माझी जीवनशैली, असं ते नेहमी सांगतात.

उद्योजक रतन टाटा हे उद्योगांमध्ये यशस्वी ठरले असले तरी त्यांना प्रेमात मात्र अपयशाचा सामना करावा लागला आहे. मी एकतर बॉम्बे हाऊसमध्ये असायचो किंवा मग कुठल्यातरी दौऱ्यावर फिरत असायचो. म्हणूनच की काय, मी लग्न करण्यापासून वंचित राहिलो. माझा विवाह ज्या मुलीशी होईल तीला आपली जीवशैली बदलावी लागणार होती‌. जे त्यांना योग्य वाटत नसायचं. ही बाब लक्षात घेता अखेर रतन टाटा यांनी लग्नच केलं नाही.

दरम्यान, सध्याच्या घडीला रतन टाटा हे टाटा उद्योगसमूहातून सेवानिवृत्त झालेले असले, तरीही ते निवृत्तीनंतरच आयुष्यही मनसोक्तपणे जगताना दिसत आहेत. मुळात आयुष्याकडे पाहण्याचा वेगळा आणि तितकाच साधासोपा दृष्टीकोन टाटा सर्वांनाच सांगून जातात. आपण त्याकडे कसं पाहतो, हे प्रत्येकजण वेगळेपणानं सांगू शकतो, मात्र रतन टाटांबद्दल आदर नाही, असा माणूस मात्र भारतात नक्कीच शोधून सापडणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या-