“…म्हणून आदित्य ठाकरेंना पाहून मी म्याऊ म्याऊ केलं’; नितेश राणेंचं स्पष्टीकरण

मुंबई | बुधवारी राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter session) सुरूवात झाली असून दुसऱ्या दिवशीही अधिवेशनात चांगलाचं सामना रंगल्याचं पाहायला मिळालं. भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विधानभवनाबाहेर आंदोलन करताना शिवसेना (Shiv Sena) नेते तथा राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aditya Thackeray) येताचं म्याऊ -म्याऊ अशा घोषणा दिल्या होत्या. त्यावरून वाद चिघळल्याचं पाहायला मिळालं आहे.

तसेच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Minister Anil Parab) आणि नितेश राणे यांच्यात वाकयुद्ध रंगलं होतं. मला विधानसभेत पुढे बसायला मिळाले म्हणून अनिल परबांच्या पोटात दुखायला लागलं, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांना पाहून म्याऊ म्याऊ जाणीवपूर्वक केलं  कारण वाघाचं मांजर झालं आहे. आता बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. भाजप नेत्यांकडून आज ‘तिघे भाऊ 100 कोटी वाटून घेऊ’, असा फलक लावल्याचं पाहायला मिळालं.

मुंबईतील राणीबागेत असणाऱ्या फलकाबद्दल आणि दर्ग्याबद्दल मुंबई महापालिकेने आणि शिवसेनेने स्पष्टीकरण द्यायला हवं, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. हिंदूच्या (Hindu) भावना दुखावल्या त्याबद्दल शिवसेनेने माफी मागावी आणि नंतर बोंबलत बसावे, असं नितेश राणे म्हणाले आहेत. मात्र, शिवसेना कधीही माफी मागणार नाही, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना नितेश राणे यांनी मी योग्य पद्धतीने काम करत आहे. माझ्या या कृतीने मला धीरूभाई अंबानीचं (Dhirubhai Ambani) वाक्य आठवलं. म्हणूनच मला टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे मी आणखी आक्रमकतेने सरकारवर तुटून पडणार, असं नितेश राणे यांनी सांगितलं  आहे.

पुढे बसण्यावरून सुरूवातीला अनिल परब यांनी आवाज उठवला. मात्र, नंतर ते तोंडावर पडले, असा खोचक टोला नितेश राणे यांनी अनिल परबांना रंगवला आहे. तसेच भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) नक्कल केल्याने नितेश राणे यांनी भास्कर जाधवांना सोंगाड्या असं म्हटलं आहे.

अधिवेशनाच्या  दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरूवारी आदित्य ठाकरे  पायऱ्या चढून जात असताना नितेश राणे यांनी त्यांच्याकडे पाहून म्याऊ-म्याऊ असा  आवाज काढला होता. नितेश राणे यांच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होतं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यानी भास्कर जाधव यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचं सांगितलं आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात विरोधकांनी पायऱ्यावर बसून केली होती.

आदित्य ठाकरे यांना धमकी आल्याने त्यावरूनही नितेश राणे यांनी बोचरी टीका केली आहे. धमकी देण्यासारख आदित्य ठाकरे काय करतात? असा खोचक सवाल यावेळी नितेश राणे यांनी केला आहे. त्यांना कोणत्या आवाजात धमक्या आल्या? त्यांनी रात्री 7 आणि 8 नंतरच्या बैठका बंद कराव्यात म्हणजे त्यांना धमक्या येणार नाहीत, असंही  नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘मी गुलजार यांच्याकडे टेनिस स्कर्ट मागितला अन् त्यांनी…’; नीना गुप्तांचा खुलासा

“अजित पवारांकडून एकदा चूक झाली, तुम्ही कशाला रात्रीचे उद्योग करता” 

आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा, पाहा व्हिडीओ 

शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता; ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर? 

‘आपला बाप आजारी असताना…’; उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना आव्हाडांनी झाप झाप झापलं