12 वर्ष लहान असलेल्या करीनाशी लग्न का केलं? सैफ अली खाननं केला खुलासा, म्हणाला…

मुंबई | बॉलिवूडमधील सर्वाधिक बहुचर्चेत असलेली जोडी म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर. हे दोघं कोणत्याना कोणत्या गोष्टीवरून चर्चेत असतात. दोघेही त्यांच्या करिअरपेक्षा त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत असतात.

या दोघांच्या लग्नापासूनच सर्वांना एक प्रश्न पडला होता. तो म्हणजे सैफ अली खानने आपल्यापेक्षा 12 वर्ष लहान असलेल्या मुलीशी लग्न कसं काय केलं? मात्र आता सैफ अली खानने या गोष्टीचा खुलासा केला आहे.

सैफने सर्व पुरूषांना वयाने लहान असलेल्या मुलीशी लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचसोबतच त्यानी सांगितलं की, अशा व्यक्तिशी लग्न करणे चांगले असते जो फन लविंग आहे. सुंदर आणि नॉन जजमेंटल असेल.या तीन गोष्टी गरजेच्या आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही गोष्टी करीना कपूरमध्ये असल्याने सैफने तिच्याशी लग्न केलं असल्याचं सांगितलं.

एका मुलाखतीत सैफ अली खानने वयाने लहान असलेल्या करिनाशी लग्न का केलं त्याविषयी तो बोलत होता. तसेच त्याने पहिल्या कोणकोणत्या गोष्टी मिस केल्या हे देखील त्यांनी सांगितलं.

सैफ अली खानने 2012 मध्ये करीनासोबत लग्न केलं. टशन या त्यांच्या चित्रपटादरम्यान त्यांची जवळीकती वाढली. अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता या दोघांना दोन मुलही आहेत. अलिकडेच म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी करीनाने आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे.

दरम्यान, सैफ अली खानचा पदार्पन हा चित्रपट रिलीजही झाला नव्हता. तेव्हाच त्याला त्याची सिनिअर अमृता सिंगवर प्रेम झाले. त्यांची त्यावेळी एका फोटोशूटवेळी भेट झाली होती. त्यानंतर 20 वर्षीय सैफने 1991 साली 32 वर्षीय अमृता सिंगसोबत लग्न केलं.

त्यावेळी त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. परंतू काही कारणास्तव त्यांचं हे लग्न फारकाळ टिकू शकलं नाही. ते 2004 साली वेगळे झाले. त्यांच्या या वेगळं होण्यामागचं कारण त्यांच्यातील वयाचं असेलेलं अंतर म्हटलं जातं.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ अभिनेत्रीला एकदा सोडून दुसऱ्यांदा झाली…

रितेश देशमुखचा ‘हा’ व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल,…

महिलेनं चक्क मगरीच्या जबड्याजवळ हात नेला अन्…, पाहा…

न्हाव्याने आधी मित्राचे केस कापले अन् त्यानंतरचा प्रकार…

एक बिस्कीट ‘या’ अभिनेत्रीच्या जिवावर बेतलं, ना…