Top news लेख

हिंदू दिवाळी सण का साजरी करतात? सविस्तर वाचा 3000 वर्षांपूर्वी आर्यकाळात काय घडलं होतं?

diwali 1 e1605351713454

दिवाळी म्हटलं की सर्वत्र एकदम आनंदाचं वातावरण असतं. प्रत्येकाच्या घरी गोडधोड फराळ, पाहुण्यारावळ्यांची चहलपहल, घरातील लहानांचा कालवा इत्यादी गोष्टी घडत असतात. दिवाळीमुळे सर्वच वातावरण कसं अगदी खुलून जातं. या प्रकाशाच्या सणात सर्वच सृष्टी जणू आनंदाने नाहून निघते. आज आपण याच सणाचा थोडा इतिहास जाणून घेवूयात.

दिवाळी हा एक प्रमुख हिंदू सण मानला जातो. जगभरातील हिंदू लोक हा सण खूप उत्साहाने साजरा करतात. पावसाळा संपून नवीन पीक हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक महिन्यांच्या संधिकाळात हा सण साजरा केला जातो. प्रत्येक सण साजरा करण्यामागे ज्याप्रमाणे काहीतरी इतिहास दडलेला असतो. त्याचप्रमाणे या सणामागे देखील इतिहासात घडलेल्या अनेक दंतकथा सांगितल्या जातात.

उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण साजरी करण्याची परंपरा किमान तीन हजार वर्षांपासून चालत आलेली आहे. दिवाळी या सणाची सुरुवात प्राचीन काळात आर्यांचे वास्तव ज्यावेळी उत्तर ध्रुव प्रदेशात होते त्यावेळी झाली, असं बोललं जातं.

उत्तर ध्रुव प्रदेशात सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून ज्यावेळी सहा महिन्यांचा दिवस सुरू होतो त्यावेळी तिथल्या लोकांना एक नवजीवन प्राप्त झाल्यासारखं वाटत होते. हा त्यांच्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता. मग याचदिवशी ते दिवाळीचा आनंदोत्सव साजरा करत असत आणि तीच प्रथा आजही हिंदू धर्मात चालवली जाते, असंही बोललं जातं.

तसेच वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रायण यासारखे यज्ञ केले जात होते. याचा समावेश सात पाकयज्ञामध्ये केला जातो. हेच दिवस पुढे दिवाळी म्हणून साजरे केले जावू लागले, असंही म्हटलं जातं. मात्र, या धार्मिक आचारात दिवाळीचे नेमके संदर्भ सापडतात असं म्हणता येत नाही, असे मत बी.के.गुप्ता यांनी आपल्या ‘फोकलोअर ऑफ दिवाली’ या पुस्तकात मांडले आहे.

आणखी एका दंतकथेनुसार एक दृष्ट राक्षस लोकांना खूप त्रास देत होता. तो इतका शक्तिशाली होता की त्या राक्षसाला कोणीही पुरुष पराभूत करू शकत नव्हता. पण श्री कृष्णाची पत्नी सत्यभामा या रक्षासला पराभूत करण्यासाठी तयार झाली आणि ती त्याच्यासमोर गेली. मात्र, त्याने त्यावेळी सत्यभामाकडे दुर्लक्ष केले आणि एक महिला काय माझा नाश करणार, असा त्याने विचार केला.

परंतु सत्यभामाने त्या राक्षसाचा पराभव केला. या राक्षसाला मृत्यूवेळी सत्यभामाने त्याची शेवटची इच्छा विचारली तेव्हा त्याने सांगितले की, माझ्या पृथ्वीवरच्या शेवटच्या दिवशी सर्वांनी प्रत्येकाने दिवे लावावेत. अज्ञानरुपी अंधकार दूर करून माझ्या मृत्यूचा दिवस साजरी करावा. माझ्या मृत्यूने सर्वांच्या जिवनात प्रकाश यावा. मग पुढे हाच दिवस दिवाळी म्हणून साजरा केला जाऊ लागला.

तसेकंग भारतातील बहुतांश भागात अशीही श्रद्धा आहे की, रामचंद्र सीतेसह अयोध्येला चौदा वर्षांच्या वनवासाला गेला होता. तो चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला याच काळात परत आला. यामुळे समस्त हिंदू लोकांनी हा दिवस दिवाळी म्हणून साजरा केला.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! आमदार रवी राणांचा जेलमध्ये अन्नत्याग तर खासदार नवनीत राणांचं जेलबाहेर धरणं आंदोलन

सलमान म्हणतोय मला जुहीशी लग्न करायचं होतं, मी तिच्या वडीलांशीही बोललो होतो पण…

सुशांत प्रकरणी नितेश राणेंचा धक्कादायक गौप्यस्फोट! तपास करणाऱ्या पोलिसांना विचारले ‘हे’ सवाल

मोठी बातमी! लोकप्रिय अॅप ‘ट्वीटर’ लवकरंच भारतात बंद होणार?

‘ते’ प्रकरण अर्जुन रामपालला महागात पडणार! लवकरच होऊ शकते अ.टक?