‘कोरोनाकाळात आंदोलनं करताय तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत’; मुश्रीफ यांची विरोधकांवर खरमरीत टीका

कोल्हापूर | कोरोनाकाळात देशात चांगलंच राजकीय नाट्य रंगलं आहे. विरोधीपक्ष आणि सरकार यांच्यात आरोप प्रत्यरोपाच्या खेळी चालूच आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून मंत्र्यांनी वरकमाई केल्याचा आरोप करत सीआयडी चौकशीची मागणी केली होती. चंद्रकांत पाटील यांच्या याच आरोपावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं आहे.

पाटलांचा हा आरोप म्हणजे सौ चुहे खाके बिल्ली चली हज को, असा प्रकार आहे. तसेच कोरोना ही जागतिक महामारी आहे. या महाभयानक संकटात हातात हात घालून लढण्याची गरज आहे. परंतु विरोधक मात्र अशा काळातही आंदोलनं करत आहेत. तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत?, असा प्रश्न मुश्रीफ यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, संबंध मंत्रिमंडळ, डॉक्टर्स, नर्सेस, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, महसूल कर्मचारी, पोलीस हे सर्वजण जिवाची पर्वा न करता गेली पाच महिने राबत आहेत. तुम्ही मात्र आंदोलनं करताय तुम्हाला लाज कशी वाटत नाही?,अश शब्दात मुश्रीफ यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आमच्या विरोधकांना कधी काय करावं याचं टाईमटेबल समजेनासं झालं आहे त्यामुळे ते त्रस्त आहेत. आंदोलनं, चळवळी टिकल्या पाहिजेत तो लोकशाहीचा आत्मा आहे. परंतू विरोधकांनो कोरोनाच्या काळात बिळात बसू नका. एकदा पीपीई किट घालून कोरोना वार्डातून फिरून या कसा घाम फुटतोय बघा, असा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“कानून के हाथ लंबे होते है, वादा किया है तो निभाना पडेगा’, जमत नसेल तर राजीनामा द्या”

‘सुशांतच्या घरी त्या रात्री महाराष्ट्रातील एक मंत्रीही उपस्थित होता’; नारायण राणे यांचा गौप्यस्फोट

‘कधी राष्ट्रवादीच्या तर कधी भाजपच्या मांडीवर जाऊन बसतोस’; मनसेच्या अविनाश जाधवांवर शिवसेनेची टीका

‘धोनीमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता त्याने 2024 ची लोकसभा निवडणुक लढवावी’; भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य!

खुशखबर! नोकिया लॉन्च करतोय नवीन 4G फोन ,असा असणार आहे फोन