पंकजा मुंडेंना पाहून का रडत आहेत ‘हे’ आजोबा? वाचा सविस्तर

नांदेड | परतीच्या पावसाने सध्या महाराष्ट्रात हाहाकार घातला आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच भागात या पावसामुळे नुकसान झाले आहे. हा पाऊस अनेकांच्या जिवावर उठला आहे. कित्येक शेतकऱ्यांची आयुष्यभराची मेहनत या पावसामुळे मातीमोल झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर  अनेक नेते महाराष्ट्र दौरा करत पाहणी करत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील सध्या पावसामुळे ज्या भागांचे नुकसान झाले आहे त्या भागाची पाहणी करत आहेत. पंकजा मुंडे या आज नांदेड दौऱ्यावर होत्या.

नांदेड मधील नुकसानग्रस्त भागाची पंकजा मुंडे यांनी आज पाहणी केली. त्या आज पारडी या गावात देखील पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. पारडी येथील एका शेतकऱ्यानं पंकजा मुंडे यांना पाहताच हंबरडा फोडला होता.

यावेळी आमचं सगळं काही गेलं आम्ही कसं जगायचं?, असा सवाल या शेतकऱ्यानं पंकजा मुंडे यांना विचारला आहे. आमचे मूग गेले, उडीद गेले सर्वकाही गेलं आम्ही आमचं आयुष्य कसं काढायचं, असं या वयोवृद्ध व्यक्तीनं पंकजा मुंडे यांना यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, एकीकडे महारष्ट्रात परतीच्या पाऊस शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेला असताना दुसरीकडे येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप होण्याची शक्यता आहे. भाजप नेते एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा सध्या चालू आहे.

एकनाथ खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असं बोललं जात होतं. मात्र, घटस्थापनेचा मुहूर्त टळल्यानं ते येत्या गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी माहिती मिळाली आहे.

खडसे यांच्या पक्ष प्रवेशासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाच्या मुहूर्तावर खडसे यांच्या समर्थकांना गुरुवारी मुंबईत जमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशीही माहिती मिळाली आहे.

एकनाथ खडसे यांच्याबरोबरच भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात. एकीकडे खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा चालू असतानाच दुसरीकडे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्या पक्षांतराच्या मुद्द्याला साफ नकार दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अखेर खडसेंचं राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं ठरलं! सर्व समर्थकांना ‘या’ मुहूर्तावर मुंबईत येण्याच्या सूचना?

नाथाभाऊंची राष्ट्रवादी प्रवेशाची ती वार्ता चुकीची, ते भाजपमध्येच राहतील?

‘या’ व्यक्तीने सातासमुद्रापार आपल्या मातृभाषेची किर्ती उंचावली; वाचा सविस्तर

स्वतःचाच ‘तो’ विक्रम मोडत शिखर धवन ठरला ‘चौकार किंग’!

काय सांगता! काहीच डाऊन पेमेंट न करता ‘ही’ गाडी खरेदी करता येणार