Top news मनोरंजन

कशाला घाबरतोय सलमान खान? सलमाननं स्वतःच केला मोठा खुलासा म्हणाला…

मुंबई | अभिनेता सलमान खान नेहमीच आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतो. सलमान खानचा दरवर्षी प्रदर्शित होणारा ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो सुद्धा प्रचंड गाजला आहे.  बिग बॉसचा चौदावा सीजन 3 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  ‘बिग बॉस 14’ शो संबंधित प्रेस कॉन्फरन्स गुरुवारी पार पडली. या प्रेस कॉन्फरन्स दरम्यान सलमान खाननं अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.

सलमान खाननं लॉकडाउनच्या काळात शूटिंग करण्याचा अनुभव सांगितला आहे. कोरोना महामा.रीमुळे शूटिंग दरम्यान येणाऱ्या अनेक अडचणी सलमाननं यावेळी सांगितल्या आहेत. तसेच सलमान खाननं या प्रेस कॉन्फरन्समध्ये तो कशाला घाबरतो याचाही खुलासा केला आहे.

कोरोनाकाळात शूटिंग करण्यासाठी मी घाबरत आहे. शूटिंग दरम्यान प्रत्येकजण आपापल्या सुरक्षेची काळजी घेत आहे. पीपीई कीट, हातमोजे, मास्क, सॅनिटाईजर अशा सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या अनेक गोष्टी प्रत्येकजण वापरत आहे. मात्र, माईक अॅडजस्ट करण्यासाठी क्रू जवळ येतो. मी सर्दी, खोकल्याला घाबरत आहे. माझ्या घरी लहान मुलं असल्यामुळे मी अगोदर शूटिंगला घाबरत होतो, असं सलमान खाननं या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं आहे.

तसेच माझी बहिण अर्पिता खानची मुलगी आयत, भाचा अहिल, आई-बाबा असे अनेकजण माझ्या घरी आहेत. या सर्वांच्या आरोग्याची मला काळजी आहे यामुळे मी घाबरत होतो. मला स्वतःसाठी केव्हाच अजिबातही भी.ती वाटली नाही पण मला आपल्या लोकांसाठी काळजी वाटते, असं सलमान खाननं यावेळी म्हटलं आहे.

कोरोनामुळे संपूर्ण जगच थांबलं आहे. बिग बॉसच्या टीम मधील इतर सर्व कलाकारांना संपूर्ण मानधन मिळणं गरजेचं आहे. इतर कलाकारांना त्यांच मानधन मिळावं म्हणून मी माझ्या मानधनात कपात करण्यास तयार आहे. माझ्यामुळे जर इतर लोकांचा पगार मिळू शकला तर मला नक्कीच आनंद होईल, असं यावेळी सलमान खाननं बिग बॉस शोच्या निर्मात्यांना सांगितलं आहे.

दरम्यान, गेल्या कित्येक दिवसांपासून ‘बिग बॉस 14’ या शोमध्ये स्पर्धक कोण असतील याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून आहे. मात्र, 3 ऑक्टोबरला बिग बॉसच्या स्पर्धकांच्या नावावरून पडदा हटणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कंगना राणावत आणि महेश भट्ट यांचा ‘तो’ फोटो व्हायरल, राखी सावंत म्हणाली…

…म्हणून ‘ही’ अभिनेत्री अक्षय कुमार समोर कपडे काढायला तयार झाली होती

रिलायन्सच्या मुकेश अंबानींचं एक पाऊल पुढे; आता इंग्रजांची ‘ही’ बडी कंपनी घेणार ताब्यात!

दोन कॅच सोडल्याने सामना गमवावा लागला; आता कोहलीला दंडही भरावा लागणार!

सुशांतसिंग प्रकरण : कोण आहे सिमोन खंबाटा?, का आली एनसीबीच्या रडारवर?