मुंबई | काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वादळी पत्रकार परिषद घेत केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर कडाडून टीका केली. ईडी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं.
संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत राज्यातील भाजप नेत्यांचे कान धरले तर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
अशातच आता संजय राऊतांना प्रत्युत्तर देण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुत्र हातात घेतली आहे. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत राऊतांवर हल्लाबोल केलाय.
मर्दाला आपण मर्द आहोत हे सांगायची गरज का पडते?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांना काल घाम का फुटला हे मी सांगणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
जो घाबरलेला असतो तोच मी घाबरलेलो नाही असं सांगत असतो, असंही ते यावेळी म्हणाले. शिवसेना वाढवण्यासाठी काम करत नाहीत. राष्ट्रवादीसाठी काम करतात, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.
तुमची संपूर्ण कुंडली माझ्याकडे आहे. संजय राऊत यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
एवढा लाचार मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे.
मला पद न दिल्यास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर आणेन असं संजय राऊत म्हणाले होते, असंही नारायण राणे म्हणाले आहे.
दरम्यान, ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला सामोरं जायला तयार व्हा, असं म्हणत नारायण राणे यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
अमोल कोल्हेंनी शब्द पाळला… घोडेस्वारी करत बैलजोडीसमोर बारी मारली!
“आमचे देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे”
‘संजय राऊत महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक, त्यांना….’; तुषार भोसले भडकले
‘मामी गप्प बसा….’; शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याची अमृता फडणवीसांवर बोचरी टीका
प्रेस कॉन्फरन्समध्ये सोमय्यांनी प्रत्यक्ष हातात जोडे घेतले, म्हणाले, ‘मारा मला मी…’