महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अन् भाजपला शिवसेनेचा जोर का झटका!

पुणे | राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका (Maharashtra Municipal Elections 2022) जवळ आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष कंबर कसताना दिसत आहे. अशात निवणुका तोडांवर असताना शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला अन् भाजपला झटका दिलाय.

महानगरपालिकेच्या तोंडावर पुण्यात अनेकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवबंधन हाती बांधलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हे सर्व प्रवेश पार पडले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेचे पारडं जड ठरणार आहे.

स्वातंत्र्यातलं सगळ्यात मोठं तंत्र आपल्या हातात लोकतंत्र आहे. आपल्या हातात जे माध्यम आहे त्यातून देशसेवा करावी, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, भाजपचे अमोल शिंदे, सरपंच, वातुंडे, सुखदेव मांडेकर, सरपंच, राष्ट्रवादी, गणेश मांडेकर, उपसरपंच, राष्ट्रवादी या साऱ्यांचा आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला आहे.

यात चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे अमोल शिंदे. वातुंडे, गावाचे सरपंच आहे. कारण त्यांच्याविरुद्ध विविध प्रकारचे गुन्हे दाखल होते. गुन्हेगारी टोळ्या आणि त्यांच्यातील टोळी युद्धाने मुळशी तालुका बदनाम झाला आहे.

दरम्यान, प्रत्येक पक्षाकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरु आहे. पण ही तयारी सुरु असताना महाविकास आघाडीतील घटक पक्षांचंच एकमेकांसोबत राजकीय युद्ध सुरुच असल्याचं चित्र आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“देशात असे चु… भरपूर आहेत, जे 2024 नंतर दिसणार नाहीत” 

वजन कमी करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा 

‘…तेव्हाच कोरोना महामारीचा शेवट होईल’; WHO प्रमुखांचं मोठं वक्तव्य

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका

“पहाटे 5 वाजता ही मी काम करायला तयार आहे, पण अंधार असतो ना”