‘या’ कारणामुळे साजरा करतात फादर्स डे, वाचा महत्त्व आणि इतिहास

मुंबई | परदेशासह भारतातही आजचा दिवस मोठ्या उत्साहाने फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुलं आपल्या वडिलांना शुभेच्छा व भेटवस्तू देतात.

‘फादर्स डे’ची मुळ संकल्पना ही अमेरिकेची आहे. 19 जून 1910 मध्ये सर्वात आधी फादर्स डे साजरा केला गेला होता.

वॉशिंग्टनच्या स्पोकेन या शहरात सोनोरा डॉड या व्यक्तीने त्यांच्या वडीलांच्या आठवणीत या दिवसाची सुरूवात केली. 1910 मध्येच सुरू झालेल्या मदर्स डे पासून डॉड यांना प्रेरणा मिळाली.

फादर्स डे दिवशी मुलं आपल्या वडिलांप्रती असलेलं प्रेम, आदर, त्याग व्यक्त करतात. आपल्या आयुष्यात वडिलांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

त्यावेळचे अध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी 1966 मध्ये जून महिन्याचा तिसरा रविवार फादर्स डे म्हणून घोषित केला. त्यानुसार 19 जून हा दिवस आता फादर्स डे म्हणून साजरा केला जातो.

भारतात हा दिवस इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जात नाही. मात्र, अनेक देशात फादर्स डेचा दिवस हा सुट्टीचा मानला जातो.

दरम्यान, कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या वडिलांविषयी प्रेम व्यक्त करणं अनेकदा राहुन जातं. त्यामुळे आजचा दिवस हा वडिलांचा त्याग, त्यांच्याप्रतीचा आदर, प्रेम या सर्वांची जाणीव करून देतो.

महत्त्वाच्या बातम्या-

चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ, गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

“10 तारखेला महाविकास आघाडीच्या पत्त्याचा बंगला हलला, आता 20 तारखेला कोसळणार”

किर्तनावेळी व्हिडीओ शुटींग करणाऱ्याला इंदुरीकर महाराजांचा सज्जड दम, म्हणाले…

भाजपला धक्का देत ‘या’ बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

“अग्निपथ योजना म्हणजे सरकारचं दिशाहीन पाऊल”