सुशांत प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट! आता अंकिता लोखंडेवरच ‘या’ प्रकरणी कारवाई होणार?

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली आहेत. सुशांत प्रकरणी सुरुवातीपासूनच सुशांतचे स्नेही, कुटुंबीय, मित्र, प्रत्यक्षदर्शी यांनी अनेक खुलासे केले आहेत. बॉलीवूड इंडस्ट्रीतील अनेकांवर सुशांतच्या मृ.त्युप्रकरणी आ.रोप करण्यात आले आहेत.

सुशांत सिंह राजपूतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवातीपासूनच याप्रकरणी वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे. सुशांत प्रकरणी अनेक लोकांनी रिया चक्रवर्तीवर आरोप केले होते. सुशांतच्या कुटुंबाने देखील सुशांतच्या मृ.त्यूला रिया चक्रवर्तीच जबाबदार असल्याचा आरोप केला होता.

सुशांत प्रकरणी तपास करत असताना सीबीआयला अं.मली पदार्थांचा संबंध आढळला. यानंतर ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो देखील याप्रकरणी तपास करू लागली. यानंतर अं.मली पदार्थ प्रकरणी बॉलीवूड इंडस्ट्रीतील अनेक बड्या कलाकारांच्या विरोधात एनसीबीनं कारवाई केली. तसेच रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं तिला देखील ता.ब्यात घेतलं होतं.

काही दिवसांपूर्वी 29 दिवसांच्या कोठ.डीनंतर रियाला जामीन मिळाला आहे. रियाला जामीन मिळताच रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी रियावर खोटे आ.रोप करत ज्यांनी तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याविरुद्ध कारवाई करणार असल्याचं म्हटलं होतं. अशातच आता रिया चक्रवर्ती सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे विरुद्ध कारवाई करणार असल्याची चर्चा सध्या चालू आहे.

मात्र, रिया चक्रवर्ती किंवा तिच्या वकिलांनी अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे या चर्चेमध्ये किती तथ्य आहे हे येत्या काही दिवसांतच समोर येईल. अंकिता लोखंडेनंही अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सुशांत प्रकरणी अंकिता लोखंडेनं आपण सुशांतच्या परिवाराच्या बाजूने असल्याचं म्हटलं होतं. सुशांतच्या कुटुंबाकडे रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे आहेत त्यामुळे शेवटपर्यंत माझा पाठिंबा त्यांना असेल, असं अंकितानं म्हटलं होतं.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्युच्या काही दिवस अगोदरच सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियनचा मृ.त्यू झाला होता. दिशाच्या मृ.त्युचा सुशांतच्या मृ.त्यूशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता सुशांतचा मित्र सुनील शुक्ला याने दिशा प्रकरण सीबीआयकडे सोपवावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

सुनील शुक्ला याने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी त्याने मुंबई उच्च न्यायालयानं दिशा प्रकरणी सीबीआयला चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली आहे. यासंबंधित सुनीलने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.

सुशांतची पूर्व मॅनेजर दिशा सालियनचा तिच्या राहत्या घरातून 14व्या मजल्यावरून पडल्यानंतर मृ.त्यू झाला होता. दिशाच्या मृ.त्युनंतर काही दिवसातच सुशांतने आ.त्मह.त्या केली. दिशा आणि सुशांत दोघांचा मृ.त्यू संशयास्पदरित्या झाला आहे. तसेच मुंबई पोलिसांनी दिशा सालियनच्या मृ.त्यूचा तपास करताना अनेक बाबींचा विचार केलेला नाही, असा आरोप सुनीलनं याचिकेत केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आणखी एका बड्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा! म्हणाली घा.णेरडे चाळे करत ‘ते’ लोक…

पंकजा मुंडे यांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य म्हणाले…

दिवाळीत फटाके फोडू नका; ‘या’ कारणामुळं तज्ज्ञांनी दिला सर्वात मोठा इशारा

सोनं खरेदी करणार असाल तर थोडं थांबा; मोदी सरकार आणतंय ‘ही’ मोठी योजना!

भाजपच्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलं काँग्रेसच्या पंजाला मतदान करण्याचं आवाहन!