Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

उपमुख्यमंत्री अजित पवार ‘त्या’ प्रकरणी अडकणार? ईडीची मोठी कारवाई

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडे बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. राजकारणात एकीकडे पक्षांतराच्या चर्चा चालू असताना दुसरीकडे ईडी अॅक्शनमध्ये आलेली दिसत आहे. ईडी महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांची घोटाळाप्रकरणी चौकशी करू शकते, अशी माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विदर्भातील घोटाळा प्रकरणी नाव समोर आलं होतं. अजित पवारांना या प्रकरणी क्लीन चीट देण्यात आली होती. मात्र, अजित पवारांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे.

जलसिंचन विभागाला ईडीकडून जलसिंचन घोटाळाप्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. ईडीनं कोकण विभागातील 2009 पासूनचे आर्थिक व्यवहार, खर्च मान्यता, टेंडर आणि जलसिंचन प्रकल्पाची माहिती मागितली आहे. तसेच 21 ऑक्टोबरला ईडीनं जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

ईडीनं या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स देखील बजावला आहे. 21 ऑक्टोबरला होणाऱ्या या चौकशी दरम्यान अनेक महत्वाची माहिती ईडीला मिळण्याची शक्यता आहे. जलसिंचन घोटाळा प्रकरणी आता  पुन्हा एकदा अजित पवारांचं नाव पुढे येतंय का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

27 नोव्हेंबर 2019 रोजी अजित पवार यांना जलसिंचन घोटाळाप्रकरणी क्लीन चीट देण्यात आली होती. 27 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. यादिवशी एसीबीच्या महासंचालकांनी अजित पवारांना क्लीन चीट देण्याचा निर्णय घेतला होता.

तसेच एसीबीनं या दिवशी जलसिंचन घोटाळ्याची 9 प्रकरणे बंद करण्यास मंजुरी दिली होती. जलसिंचन घोटाळ्याची ही प्रकरणे त्यावेळी अजित पवारांशी संबंधित असल्याचं बोललं जात होतं. मात्र, एसीबीनं हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, भाजप नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार, असं बोललं जात आहे. खडसे यांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता मौन सोडत उत्तर दिलं आहे. भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाविषयी मला काहीही माहित नाही. एकनाथ खडसे यांच्या विषयी जेवढी माहिती मला होती. ती सर्व माहिती मी माध्यमांना दिली आहे, असं अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

तसेच राजकारणामध्ये नेत्यांच्या एकमेकांशी भेटीगाठी होत असतात. राज्यात भाजप सरकार असताना आम्हीही अनेकवेळा नेत्यांना भेटलो आहे. राजकारणात अनेकवेळा लोकप्रतिनिधींच्या नात्यानं भेटीगाठी घेतल्या जातात, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अखेर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या मुहूर्तावर सोडलं मौन म्हणाले…

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! आता सुशांतचा मित्र संदीप सिंहनं उचललं ‘हे’ पाऊल

आता भाजपचा ‘हा’ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर? राजकीय चर्चेला उधाण

रोहन रॉय सुशांतच्या मृ.त्यूला जबाबदार? सीबीआयची मोठी कारवाई!

खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या मुद्द्यावर अजित पवारांनी सोडलं मौन म्हणाले…