भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटविण्यात येणार?

मुंबई | गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरोना महामारीनं संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातही लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. सरकारनं काही दिवसांनी नियमांमध्ये शिथिलता देत हळू हळू अनेक गोष्टी चालू केल्या. मात्र, मंदिरं, मस्जिद गुरुद्वारे यांसारखी प्रार्थना स्थळे अद्याप उघडण्यात आली नाहीत.

महाराष्ट्र राज्यातील प्रार्थना स्थळे उघडण्यात यावीत यासाठी नुकतंच महारष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. भगतसिंग कोश्यारी यांनी पत्रात ठाकरेंना तुम्ही धर्मनिरपेक्ष बनला आहात काय? असा आक्षेपार्ह्य सवाल देखील विचारला होता.

भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रामुळे डाव्या विचार सरणीचे लोक कोश्यारी यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. भगतसिंग कोश्यारी यांनी प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून राज्यघटनेचा अपमान आणि भंग केला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या कृतीमुळे त्यांना राज्यपालाच्या पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी डाव्या पक्षांकडून करण्यात येत आहे. राज्यपालांना पदावरून हटविण्याबाबत डाव्या पक्षांकडून राष्ट्रपतींना निवेदनंही देण्यात आली आहेत.

कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना तुम्ही धर्मनिरपेक्ष झालात का?, असा सवाल विचारून राज्यघटनेचा अवमान केला आहे. भारत धर्मनिरपेक्षतेविषयी वचनबद्ध राहणार असल्याची ग्वाही राज्यघटनेतून देण्यात आली आहे. कोश्यारी यांनी विचारलेल्या सवालामुळे त्यांनी राज्यपाल पद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचा भंग झाला आहे, असं डाव्या पक्षांनी निवेदनात म्हटलं आहे.

तसेच भाकपनेही राज्यपालांना हटविण्याबाबत निवेदन दिलं आहे. कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना केलेलं पत्र पाहता त्यांनी राज्यघटनेचा अपमान केला आहे. यामुळे राष्ट्रपतींनी त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी भाकपने केली आहे.

भाकप प्रमाणेच माकपनेही राज्यपालांना हटविण्याची मागणी केली आहे. माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी यासंबंधित एक ट्वीट करत राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

राज्यपाल म्हणून कोश्यारी यांनी केलेली कृती आक्षेपार्ह्य आहे. ते भारताच्या राज्यघटनेचं उघडपणे उलंघन करत आहेत. राष्ट्रपतींनी महाराष्ट्राच्या राज्यपालाच्या पदावरून कोश्यारी यांना हटवावं, असं ट्वीट सीताराम येचुरी यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रितेश-जेनेलियाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; जेनेलियानं दिली खूशखबर!

शरद पवारांनी केलेल्या ‘या’ गोष्टीमुळे राजकारणात चुकीचा पायंडा पडला- बाळासाहेब विखे

सुशांत प्रकरणी ‘हा’ बडा निर्माता ईडीच्या रडारवर; ईडीनं छापा टाकत केली मोठी कारवाई

शरद पवारांनी दिलेली ‘ती’ माहिती असत्य; बाळासाहेब विखे-पाटलांच्या पुस्तकात धक्कादायक गौप्यस्फोट

राष्ट्रवादी कॉंग्रेस राजू शेट्टींना दिलेलं ‘ते’ वचन पाळणार का?