मुंबई | कॉमेडियन भारती सिंगने अगदी कमी वेळात मनोरंजन विश्वात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. दर्शकांना नेहमी हसवत ठेवण्याची कला भारतीमध्ये आहे. तिने अनेक रिअॅलिटी शोजमध्ये होस्टींग देखील केलं आहे. कायम जोक्समुळे प्रेक्षकांना हसवत राहणारी भारती आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
भारतीने 2017 साली आपला बॉयफ्रेंड हर्ष लिंबाचियासोबत लग्न केलं होतं. भारती आणि हर्षच्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. यामुळे भारतीला नेहमीच तू आई केव्हा होणार? हा सवाल केला जातो. अशातच आता एका फोटोग्राफरने देखील पुन्हा भारतीला हाच सवाल केला आहे.
सध्या भारती ‘डान्स दिवाने’ आणि ‘द कपिल शर्मा शो’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. डान्स दिवानेच्या सेटवरुन भारती आपल्या व्हॅनिटीजवळ जात असताना पॅपराजी नेहमीच तिचे फोटो काढताना तसेच तिला वेगवेगळे सवाल करताना दिसत असतात. याचवेळी एका फोटोग्राफरने भारतीला आई होण्यासंदर्भात हा सवाल केला होता.
यावेळी फोटोग्राफरला उत्तर देताना भारती म्हणाली की, सर्वांनाच आम्ही आईवडिल केव्हा होणार याची प्रतिक्षा लागून आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला एकांत द्या. भारतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, सर्वांना हसवणारी भारती नुकतीच डान्स दिवानेमध्ये खूप भावूक झालेली पाहायला मिळाली होती. लव्ह स्पेशल वीकमधील एक डान्स सर्वांच्याच डोळ्यात अश्रू आणणारा ठरला आहे.
रुपेश सोनी आणि सद्दाम शेख या दोन स्पर्धकांनी या एपिसोडमध्ये लव्ह थीमवर एक डान्स सादर केला. यामध्ये एकाने भिकाऱ्याची तर एकाने कुत्र्याची भूमिका केली. डान्समध्ये भिकारी आणि कुत्र्याचे संबंध आणि दोघांचाही जगण्यासाठी चाललेला संघर्ष दाखवण्यात आला.
हा डान्स खूप भावूक करणारा ठरला. या दोघांचा डान्स पाहून माधुरी दीक्षित आणि तुषारसह भारतीला देखील अश्रू अनावर झाले. भर कार्यक्रमात हे सर्वजण रडताना दिसले. तसेच यावेळी स्पर्धकांसह उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले.
महत्वाच्या बातम्या –
सलमान खान एक्स गर्लफ्रेंडसोबत तुर्कीत करतोय मजा?
पियंका चोप्रानं पतीसोबत शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोची सोशल मीडियावर चर्चा, पाहा फोटो
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी
शाहरुखची मुलगी सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये राहतेय…
‘तुला बाॅयफ्रेंड आहे का?’ असं विचारणाऱ्या…