“चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार का?”, पत्रकारांच्या प्रश्नावर दादा म्हणाले…

मुंबई | उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपच्या सत्यजीत कदम यांना धुळ चारत जयश्री जाधव यांनी काँग्रेसला पुन्हा उभारी दिली.

कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक सभा घेतल्या आणि प्रचार केला होता. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं होतं.

या पोटनिवडणुकीत जर भाजप हारली तर हिमालयात निघून जाईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यानंतर आता भाजपला पराभव झालेला आहे. अशातच आता चंद्रकांतदादा हिमालयात जाणार का?, असा सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय.

भाजपच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटील माध्यमांना समोरे गेले. त्यावेळी पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना हिमालयात जाणार का?, असा सवाल केला. त्यावर चंद्रकांत पाटलांनी भाष्य केलं आहे.

नागरिकांनी दिलेला मतदारांचा कौल आम्ही मान्य करतो. सत्यजित कदम लढले तर फेस आला, मी लढलो असतो तर काय झालं असतं. मी लढलो नाही, त्यामुळे मला हिमालयात जाण्याचा प्रश्न नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

आम्ही प्रयत्न करण्यात कुठं कमी पडलो नाही. पैशाचा, दंडुकेशाही आणि जातीचा वापर केला गेला, असा आरोप पाटलांनी केलाय. तर माझ्या अंगावर येण्यास देखील हे मागे राहिले नाहीत, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“TV वर येत एकजण नाचतोय, बेगानी शादी मे अब्दुल्ला दीवाना”

‘मी पोहोचलो रे हिमालयात, नको परत या….’; राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटलांना डिवचलं

उत्तर कोल्हापूरात इतिहास घडणार, गेल्या 50 वर्षांत जे झालं नाही ते होणार!

भाजपला सर्वात मोठा झटका; जयश्री जाधवांचा दणदणीत विजय

भाजपला धक्का?, उत्तर कोल्हापुरात काँग्रेस विजयाच्या उंबरठ्यावर