मुंबई | काँग्रेस (INC) पक्षाला 2019 सालापासून कायमस्वरुपी अध्यक्ष नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसचा दारुन पराभव झाल्यानंतर राहूल गांधीनी (Rahul Gandhi) त्या पराजयाची जबाबदारी घेत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
त्यानंतर सध्याच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आणि त्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष झाल्या. त्यानंतर आता पक्षात नवीन अध्यक्षासाठी निवडणूक होणार आहे.
या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अनेक दिग्गज नेते उत्सुक आहेत. तसेच गांधी कुुटुंबीयातील तिघांपैकी कोणीही निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील नेत्यांच्या नावावर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेसला आगामी अध्यक्ष महाराष्ट्रातून मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde), नाना पाटोले (Nana Patole) आणि मुकुल वासनिक (Mukul Vasnik) यांच्या नावाच्या सोनिया गांधी यांनी चर्चा केल्याचे समजते आहे. मात्र या चर्चांना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी पूर्णविराम दिला आहे.
सुशीलकुमार शिंदे आणि मुकुल वासनिक हे दोघे सोनिया गांधी यांच्या अत्यंत जवळचे आहेत. तर नाना पाटोले हे राहूल गांधी यांचे विश्वासू आहेत. त्यामुळे या नेत्यांच्या नावांची चर्चा होत आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी माझ्या नावाची चर्चा झाली आहे. ह्या फक्त अफवा आहेत. राहूल गांधी यांनीच अध्यक्ष व्हावे, अशी आमची इच्छा आहे, असे नाना पाटोले म्हणाले.
काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी व्हावे, अशी पक्षातील 99% लोकांची इच्छा आहे, असे देखील पाटोले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मेळघाट दौरा गाजतोय, फोटो सोशल मिडियावर व्हायरल
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण, वाचा आजचे ताजे दर
दाऊदला पकडण्यासाठी एनआयए सज्ज, केली मोठ्या बक्षिसाची घोषणा
शिवसेनेच्या ‘दसरा मेळाव्याबाबत’ नारायण राणेंचा मोठा दावा, म्हणाले…