देशाच्या इंचनइंच जमिनीवरुन घुसखोरांना बाहेर काढू- अमित शहा

नवी दिल्ली : देशाच्या इंचन् इंच जमिनीवरुन आणि प्रवाशांना बाहेर काढू, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत. राज्यसभेत प्रश्नोत्तरांदरम्यान ते बोलत होते. 

आसाममध्ये लागू असलेली  नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स आसाम कारारचा हिस्सा असल्याचंही अमित शहांनी सांगितलं. 

सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांना राष्ट्रपतींचं भाषण ऐकलं असेल. आम्ही ज्या संकल्पपत्राच्या आधारे निवडणून आलो त्यामध्ये याचा समावेश आहे, असंही शहा म्हणाले.

देशाच्या इंचनइंच जमिनीवर जितके अवैध प्रवासी, घुसखोरी राहतात. त्यांची ओळख पटवली जाईल. आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत त्यांना देशाबोहर काढलं जाईल, असं आश्वासन अमित शहांनी केलं आहे.

काही भारतीयांना भारतीय नागरिक मानलं जात नाही. अशा 25 लाख लोकांचे अर्ज राष्ट्रपती आणि सरकारकडे आले आहेत. 

देशाबाहेरुन आलेल्या काहींना भारतीय म्हणून मानलं गेलं आहे. राष्ट्रपती आणि सरकारकडे आलेल्या अर्जांवर विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे पुरेसा वेळ मागण्यात आल्याचं अमित शहांनी सांगितलं.