राठोडांनंतर आता धनंजय मुंडे देखील राजीनामा देणार? पंकजा मुंडे म्हणाल्या…

बीड | गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत  आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात आ.रोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. दोन्ही बाजूचे नेते सतत कोणत्या न कोणत्या मुद्द्यावरून एकमेकांना टा.र्गेट करत आहेत.

नुकतंच पुण्यात  झालेल्या पूजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरणावरुन राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. पूजा चव्हाण प्रकरणावरुन शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्यासह राज्य सरकारवर देखील विरोधकांनी अनेक गंभीर आरोप केले होेते. विरोधकांच्या सतत होणाऱ्या टिकेनंतर अखेर संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता विरोधक राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करु लागले आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी आता महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे.

नुकतंच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना महत्वाचं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला देखील धारेवर धरलं आहे.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, वैयक्तीक बाबतीत विचार करता ज्यांच्यावर आरोप होत आहेत. त्यांनी भूमिका घ्यायला हवी. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून वारंवार मागणी होत आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हरकत नाही.

तसेच सरकार टिकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातलं जात आहे, हे आपलं दुर्दैव आहे. संजय राठोड प्रकरणात निष्पक्षपातीपणे चाैकशी व्हायला हवी. सध्याच्या सरकारने जो पायंडा घातला आहे, तो चुकीचा आहे. तो एका स्त्रीसाठी घातक आहे, असाही आरोप पंकजा मुंडे यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण टीकटॉकमुऴे प्रकाशझोतात आली होती. ती मूऴ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील होती. पुणेे येथे ती वानवडी भागात इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती.

८ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाणने इमारतीतून उ.डी घेऊन आत्मह.त्या केली. प्रथमदर्शनी तिने त.णावातूऩ आ.त्मह.त्या केल्याचं बोललं जात होतं. मात्र, या प्रकरणाच्या 12 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आणि राजकीय वर्तुऴात एकंच खळबळ उडाली.

या प्रकरणामागे संंजय राठोड यांचा हात असल्याचा आ.रोप सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षातील नेते करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यातील ‘या’ ठिकाणी फुकट वडापाव खालल्याने गजा मारणेवर गु.न्हा दाखल

राठोडांकडून 5 कोटी रुपये घेतल्याच्या त्या आरोपावर पूजाच्या वडिलांनी अखेर माैन सोडलं, म्हणाले…

मुंबईतील नाईट लाईफवरुन देवेंद्र फडणवीस आ.क्रमक, राज्य सरकारवर टीका करत म्हणाले…