“योगी होण्यासाठी फडणवीस बायकोला सोडणार का?”

मुंबई | राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेमुळे सध्या राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर आता राजकारणात मोठा वाद रंगण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातील धार्मिकस्थळांवरील आणि विशेषतः मशिदींवरील भोंगे उतवरल्याबद्दल राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचं कौतूक केलं होतं. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी, असा टोला देखील राज ठाकरे यांनी लगावला होता.

त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ये भोगी, काही तरी शिक आमच्या योगींकडून, असं एका वाक्याचं ट्विट अमृता फडणवीस यांनी होतं. त्यानंतर आता शिवसेनेने नेत्या दिपाली सय्यद यांनी उत्तर दिलं आहे.

दिपाली सय्यद यांनी देवेंद्र फडणवीस यांना वादग्रस्त प्रश्न विचारला आहे. योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं, तुम्हाला योगी होण्यासाठी बायकोला सोडणार का?, असा सवाल आता दिपाली सय्यद यांनी विचारला आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना नेत्यांची बैठक घेतली आणि भाजप आणि मनसेवर तुटून पडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर दिपाली सय्यद यांचं वक्तव्य चर्चेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

MPSC परीक्षेचा निकाल जाहीर; सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात पहिला

‘बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते?’; उद्धव ठाकरेंचा सवाल

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तर अजितदादा गडकरींच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

काळजी घ्या! पुढील 4 दिवस महत्त्वाचे; राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा

मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; तब्बल दीड तास खलबतं