मुंबई | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg District) शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यावरून आता नितेश राणे (Nitesh Rane not reachable) यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
नितेश राणे नाॅट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. अटकेची टांगती तलवार लटकलेली असताना नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी झाली होती. मात्र, आज नितेश राणे यांना दिलासा मिळणार नाही. वेळ संपल्याने या प्रकरणावर युक्तीवाद थांबवण्यात आला होता.
आता या प्रकरणावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांना बेल मिळणार की जेल मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
परब यांच्यावर जो हल्ला झालेला हा जीवघेणा हल्ला आहे. हा प्रकार अपघाताचा नव्हे तर विचारपूर्वक हल्ला केला आहे. यामध्ये मुख्य सूत्रधार हे नितेश राणे आहेत हे आम्ही न्यायालयापुढे मांडलं असल्याचं वकील विकास पाटील शिरगावकर यांनी सांगितलं आहे.
न्यायालयाचा वेळ संपल्यानं त्यांचा युक्तीवाद पूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळं ते उद्या पुन्हा आपली बाजू मांडणार आहेत. उद्या आमचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर या विषयावर आम्हाला बोलता येईल, असं नितेश राणे यांचे वकील अॅड संग्राम देसाई यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उद्या दुपारी पावणेतीन वाजता या सुनावणीला पुन्हा सुरुवात होईल. त्यामुळे आता नितेश राणे यांच्या अडचणी वाढणार की कमी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भाजपचे आमदार फुटणार???, नाना पटोलेंचे सुचक संकेत
MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली
काल रात्री नेमकं काय घडलं?, रोहिणी खडसेंनी सांगितला थरारक अनुभव
नितेश राणे यांच्यासमोर बोलण्याची कुणाची ताकद नाही – नारायण राणे