सोनं पुन्हा प्रतीतोळा 56 हजारापार जाणार? गेल्या 15 दिवसांत सोन्याच्या दरात 6 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कौल आहे. भारतातील लोकांला सोन्याच्या असलेल्या चाहतीमुळे भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने घट होताना पाहायला मिळत होती. सोन्याबरोबरंच चांदीच्या दरात देखील घट पाहायला मिळाली होती. मात्र, आता पुन्हा या दरात वाढ अनुभवायला मिळत आहे.

भारतात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुपयाच्या दरात घसरण अनुभवायला मिळत आहे. यामुळे सोन्याच्या दरात फार मोठी वाढ होत आहे. तसेच आता लग्नाचा हंगाम देखील जवळ येत आहे. यामुळे देखील सोने-चांदीच्या दरात वाढ अनुभवायला मिळत आहे.

गेल्या 15 दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 6 टक्क्यांची वाढ अनुभवायला मिळाली आहे. गेले काही आठवडे स्वस्त झालेलं सोनं पुुन्हा एकदा उच्च पातळीकडे जाऊ लागलं आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोनं 56 हजार 200 रुपये प्रती तोळ्यावर पोहोचलं होतं. सध्या सोन्याच्या दराचा वाढीचा वेग पाहता सोनं पुन्हा 56 हजारापार जाण्याची शक्याता वर्तवली जात आहे.

काल एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याचा बाजार 46 हजार रुपये प्रती तोळ्यावर बंद झाला होता. आज हाच दर 46 हजार 10 रुपये प्रती तोळ्यावर बंद झाला आहे. अशाप्रकारे आज सोन्याच्या दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे.

आज चांदीच्या दरात मात्र काहीही बदल झालेला नाही. काल एमसीएक्सवर प्रती किलो चांदीचा दर 68 हजार 600 रुपये होता. आज देखील चांदीचा हाच दर आहे.

गेल्या काही आठवड्यांमध्ये सोने-चांदीचे दर खूप खाली उतरले होते. मात्र, येत्या काही दिवसांत सोने-चांदीचे दर वाढतील असे अनेक अभ्यासक बोलत आहेत. यामुळे साने-चांदी खरेदी करण्याची हीच संधी मानली जात आहे.

मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांश वेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातो.

या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

महत्वाच्या बातम्या –

भारतातील सर्व नद्यांना स्त्री समजलं जातं, मात्र ‘या’ एकमेव नदीला पुरुष समजलं जातं; वाचा काय आहे कारण?

फडणवीसांचा मध्यरात्रीचा पोलीस स्टेशनमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानं खळबळ; पाहा व्हिडीओ

लज्जास्पद! ‘माझ्या आईला वाचवा डॉक्टर’; मुलांच्या आर्त हाकेनंतरही डॉक्टरनं उपचार नाही केला; व्हिडीओ व्हायरल

भर रस्त्यात चालू कारमधून बाळ खाली पडलं, आई मात्र गाडी चालवत पुढे गेली अन् मग…; पाहा व्हिडीओ

‘द कपिल शर्मा शो’मधील अभिनेत्रीनं केला साखरपूडा, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती