पुढच्या वर्षी IPL खेळणार का?; ‘थाला धोनी’ म्हणतो…

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्येच नाही तर जगातील क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा भारताचा सर्वकालिन महान कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. सध्या आपल्या क्रिकेट करिअरच्या अंतिम टप्प्यात धोनी पोहोचला आहे.

महेंद्रसिंग धोनी फक्त भारतीय संघाचा नाही तर आयपीएलमधील चेन्नईचा यशस्वी कर्णधार सुद्धा आहे. दोन वर्षाची बंदी होवूनही सर्वाधिक वेळा अंतिम सामना खेळण्याचा विक्रम चेन्नईनं धोनीच्याच काळात केला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2020 मध्ये चेन्नई संघानं चौथ्यांदा आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला. अन् धोनीनं पुढील आयपीएल स्पर्धा आपली शेवटची स्पर्धा असेल असं जाहीर करून टाकलं होतं.

धोनी आयपीएल 2021 मध्ये शेवटचा खेळण्यासाठी उतरणार म्हणल्यावर सर्वत्र चर्चा तर होणारच. येत्या काही दिवसांमध्ये आयपीएल स्पर्धेसाठी खेळडूंची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.

एका कार्यक्रमात धोनीला पुढील वर्षात चेन्नईकडून खेळणार का नाही असा प्रश्न विचारण्यात आला. यावर धोनीनं मी माझा शेवटचा सामना चिन्नास्वामी मैदानात खेळणार असं म्हटलं आहे.

महेंद्र सिंग धोनीनं येणाऱ्या काळात चेन्नईसोबतच राहण्याचं संकेत दिले आहेत. मी अजून 10 वर्षतरी याच फ्रंचायझीसोबत राहणार असल्याचं धोनी म्हणाला आहे.

आगामी आयपीएल 2021 स्पर्धा सुरू होण्यासाठी अजून बराच काळ शिल्लक आहे. परिणामी मी कोणाकडून खेळणार याचा विचार आत्ताच केला नसल्याचंही धोनी म्हणाला आहे.

चेन्नई संघाची हित हेच आमचं लक्ष असल्याचं धोनी म्हणला आहे. आम्हाला चेन्नई संघाला अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचंही धोनी म्हणला आहे.

दरम्यान, महेंद्र सिंग धोनी हे क्रिकेट जगातातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये गणला जातो. भारतीय क्रिकेटला दोन विश्वचषक मिळवून देण्यात धोनीची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते.

महत्त्वाच्या बातम्या-

 एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढण्याची शक्यता; ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

खट्टी मीठी यारी! तीन पक्षातील तीन दिग्गज नेत्यांचा एकाच सोफ्यावर बसून हास्यकल्लोळ

“आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला”

घोटाळ्यांवरुन गदारोळ सुरु असताना आणखी एका 100 कोटींच्या घोटाळ्याचा दावा