Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या मुद्द्यावर अजित पवारांनी सोडलं मौन म्हणाले…

मुंबई | महाराष्ट्रातील राजकारणात कधी काय घडेल याचा काहीच नेम नसतो. बऱ्याच दिवसांपासून राजकारणात भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे याचं नाव आपल्या समोर येत आहे. अलीकडे एकनाथ खडसे भाजपमधीलच काही नेत्यांची नावं घेत त्यांच्यावर आरोप करत आहेत.

एकनाथ खडसे यांनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या वक्तव्यांमुळे खडसे भाजप पक्षाला रामराम ठोकणार, असं सातत्यानं बोललं जात होतं. आता एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशीही माहिती समोर आली आहे. खडसे यांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता मौन सोडत उत्तर दिलं आहे.

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाविषयी मला काहीही माहित नाही. एकनाथ खडसे यांच्या विषयी जेवढी माहिती मला होती. ती सर्व माहिती मी माध्यमांना दिली आहे, असं अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

तसेच राजकारणामध्ये नेत्यांच्या एकमेकांशी भेटीगाठी होत असतात. राज्यात भाजप सरकार असताना आम्हीही अनेकवेळा नेत्यांना भेटलो आहे. राजकारणात अनेकवेळा लोकप्रतिनिधींच्या नात्यानं भेटीगाठी घेतल्या जातात, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसे यांचा भाजप नेत्यांबर चाललेला वाद समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील इतरही काही नेत्यांनी खडसेंच्या प्रवेशाबद्दल भाष्य केलं होतं. एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर आम्हालाही आनंद होईल, असं कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं.

तसेच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनीही खडसे यांना शिवसेनेत प्रवेश करण्याचं निमंत्रण दिलं होतं. मात्र, इतर सर्व पक्ष नेत्यांची निमंत्रणं नाकारत खडसे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेण्याचं ठरवल असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला होता. दहा-पंधरा वर्षांपूर्वी पक्षात आलेले नेते आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत, अशा खरमरीत शब्दात एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता.

एकेकाळी राज्यात भाजप पक्षाला प्रतिकूल परस्थिती असतानाही नितीन गडकरी, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार, भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे आणि मी आम्ही सर्वांनी मिळून पक्षासाठी कष्ट करून पक्षाची उभारणी केली आहे, असंही एकनाथ खडसे यांनी यावेळी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! सुशांत प्रकरणी ‘ते’ वृत्त चुकीचे; सीबीआयने दिले स्पष्टीकरण

अनुरागवर लैं.गिक छ.ळाचा आरोप करणारी पायल ‘त्या’ घटनेचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

फाऊल प्लेचा निकाल देऊन सीबीआय सुशांत प्रकरण बंद करणार?

सुशांतच्या बहिणीने उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल! सुशांतचे चाहते झाले हैराण 15/10/2020 3:56 PM

मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बे.ड्या