महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार? मुख्यमंत्री म्हणाले…

मुंबई |  जवळपास गेल्या वर्षभरापासून कोरोना महामा.रीनं संपूर्ण जगात थै.मान घातलं आहे. चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या या महामा.रीनं अक्षरश: सर्वांच्या नाकी नऊ आणलं आहे. मधल्या काळात देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र, पुन्हा देशात कोरोनानं डोकं वर काढलं आहे.

महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्ण पुन्हा एकदा खूप झपाट्याने वाढताना दिसत आहेत. यामुळे महाराष्ट्रांत काही भागात प्रशासनानं कडक नि.र्बंध लावले आहेत. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता धो.का पाहता लवकरंच संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. आज मुख्यमंत्री मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात काही भागात लॉकडाऊन लागू करण्याबाबत एक दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल. नागरिकांनी नियम पाळण्याची गरज आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कठोर निर्णय घ्यावे लागतील. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत राहिल्यास नाईलाजाने लॉकडाऊन लागू करावं लागेल.

दरम्यान, कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. देशभरात 16 जानेवारीपासून सुरु झालेलं कोरोना लसीकरण सर्वसामान्य नागरिकांपर्यंत येऊन पोहोचलं आहे. देशात 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे.

देशभरातील 10 हजार सरकारी आणि 20 हजार खासगी केंद्रांमधून हे लसीकरण केले जात आहे. सरकारी केंद्रावरील लसीकरण हे पूर्णपणे मोफत आहे. मात्र, खासगी केंद्रावर काही शुल्क घेऊन लस दिली जात आहे.

गेल्या वर्षभरापासून देशभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना वि.षाणूचा फैलाव गेल्या काही महिन्यांत कमी झाला होता. मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून देशातील काही राज्यांत कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी लसीकरण सुरू होणं हे दिलासा देणारं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक शहरांत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत असे आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या –

डेलकर प्रकरणाला धक्कादायक वळण! ‘या’ व्यक्तीने डेलकरांकडे 25 कोटींंची खंडणी मागितली

ऐन निवडणुकीच्या काळात ममता बॅनर्जींवर ह.ल्ला? प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक खुलासा!

…अन् भर चौकात पोलिसांनी तिच्या कानशिलात वाजवली; पाहा व्हिडिओ

‘या’ कारणामुळे 60 वर्ष आजोबांचा विजेच्या खांबावर चढून गोंधळ

‘सॉरी, तुला खूप त्रास दिला…’; नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरुन मागितली रिया चक्रवर्तीची माफी