कल्याण | राज्यात कोणत्याना-कोणत्या विषयाच्या चर्चा रंगतच असतात. तर अशातच राज्यातील काही ठिकाणी महानगरपालिका निवडणुकांचं वारं घुमत आहे.
असं असतानाच येत्या महापालिका निवडणुका राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि त्यातील पक्ष एकत्र लढणार की, सर्व पक्ष आपल्या स्वबळावर लढणार? असे सवाल केेले जात आहे. अशातच यावर राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे.
आम्ही एका सरकारमध्ये आहोत. सरकारमध्ये राहायचे आणि वेगळे वागायचे असे आम्ही करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काल म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी ते कल्याण दौऱ्यावर होते. त्यावेळी ते बोलत होते.
त्याचप्रमाणे आमचे दोन मित्र पक्ष आणि इतर मित्र पक्ष जिथे सोबत असतील त्याठिकाणी आमची आघाडी असेल, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, जयंत पाटलांच्या बोलण्यावरून असं वाटतं आहे की, येत्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्रच निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वाटतं आहे. परंतू निवडणूक म्हटलं की, काही सांगता येत नाही. यामध्ये काहीही होऊ शकतं. त्यामुळे निवडणूकीच्या वेळी कोणते पक्ष एकत्र येतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये मोठा बदल, वाचा आजचा दर
मलिकजी माझ्या कुटुंबाची प्रायव्हसी भंग करु नका- समीर वानखेडे
मागासवर्गीय असल्यानेच समीर वानखेडेंना टार्गेट केलं जातंय- रामदास आठवले
“बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील”
“मोदी सरकारने लसीकरणाच्या शंभरीनंतर आता इंधनाची शंभरी साजरी करावी”