‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे गजाआड जाणार?

मुंबई | मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार हे त्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात. सोशल मीडियावर ट्रोल होणं, हे अशा कलाकारांसाठी काही नवीन नसतं. मात्र, हीच वक्तव्य या कलाकारांच्या काहीवेळा चांगलीच अंगलट येतात.

आता असंच काहीसं मराठी अभिनेत्री केतकी चितळेसोबत झालं आहे. केतकी चितळे अभिनयाबरोबरच तिच्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असते. केतकी सोशल मीडियावर आपलं मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. मात्र, यामुळे तिला अनेकदा ट्रोल व्हावं लागलं आहे.

सोशल मीडियावर केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे केतकी आता कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. नवबौद्धांविषयी केलेलं वादग्रस्त वक्तव्य केतकीच्या चांगलंच अंगलट आलेलं दिसत आहे. याप्रकरणी केतकी गजाआड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एका जुन्या प्रकरणात केतकीचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे केतकीला केव्हाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 1 मार्च 2020 रोजी केतकी चितळेनं फेसबूकवर एक पोस्ट केली होती.

यामध्ये केतकी म्हणाली होती की, 6 डिसेंबर रोजी नवबौद्ध फुकट मुंबई दर्शनास येतात. तो त्यांचा धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू शब्द उच्चारला तर घोर पापी आणि कट्टरवादी? परंतु यामध्ये चूक आपलीच आहे.

आम्ही स्वतःच्या भांडण्यात एवढं गुंतून जातो की आपल्याला आपल्यात फूट पडणारे नेते आवडतात. आम्ही त्यांना फूट पाडून देतो आणि स्वतःचा धर्म विसरतो, असं केतकीने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

दरम्यान, केतकीच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या. केतकीच्या या पोस्टमुळे दलित बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. यामुळे त्यावेळी अट्रोसिटी कायद्याअंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या-

सिद्धार्थच्या मृत्यूमुळे कोलमडलेली शेहनाज ग्लुकोजवर? डिझायनरने केला खुलासा

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लवकरच अडकणार लग्नबंधनात? शाहिरचा मोठा खुलासा

‘हेल्मेट घालूनच पहिला कंडोम विकत घेतला होता’; ‘या’ बड्या अभिनेत्याने शेअर केला मजेशीर किस्सा

अचानक अस्वल चढलं गाडीवर अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

झोपलेल्या चिमुकल्या जवळ जाऊन कुत्र्यानं जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हायरल व्हिडीओ