मोदी महाविकास आघाडीचं सरकार पाडत राष्ट्रपती राजवट लागू करणार? चंद्रकांत पाटील म्हणाले…

पुणे | अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षातील नेते महाविकास आघाडी सरकारला टार्गेट करण्याचा एकही मुद्दा सोडत नाहीत. विरोधी पक्षातील नेते राज्य सरकारला सतत टार्गेट करत आहेत.

भाजप नेते चंद्रकांत पाटील देखील सुरुवातीपासूनच महाविकास आघाडी सरकारवर कोणत्या न कोणत्या मुद्द्यावरून निशाणा साधत आहेत. पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारला टार्गेट केलं आहे. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींची भूमिका देखील मांडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकनियुक्त सरकार कधीच पाडणार नाहीत. मोदिजींचा दर्जा वेगळा आहे. मोदी हे लोकमताचा आदर करणारे नेते आहेत. यामुळे नरेंद्र मोदी किंवा अमित शहा राज्यातील सरकार पाडून केव्हाच राष्ट्रपती राजवट लागू करणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याबाबत काही नेते काहीही बोलत आहेत. ते नेते असे का बोलत आहेत याविषयी मला काहीच माहित नाही. त्याबद्दल त्या नेत्यांनाच जावून सवाल विचारा, असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होवून जवळपास वर्ष लोटून गेलं आहे. तरी देखील महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना एकत्र येत सरकार स्थापन करणार, अशा चर्चा दब्या आवजात चालू आहेत. मात्र, याच चर्चांना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला होता.

पंकजा मुंडे मंगळवारी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भाजप आणि शिवसेनेच्या संबंधांवर भाष्य केलं होतं.

शिवसेना भाजपची युती 2014 मध्येही तुटली होती. यानंतर आता पुन्हा युती तुटून राज्यात सरकार स्थापन होवूनही एक वर्ष लोटून गेले आहे. यामुळे आता या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यात काहीही अर्थ उरलेला नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, राजकारणात केव्हा काय होईल याबद्दल काहीही सांगता येत नाही. यामुळे पंकजा मुंडे यांनी सध्या जरी या चर्चांना पूर्णविराम दिला असला तरी यापाठीमागे किती तथ्य आहे?, हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

आमीर खान ‘या’ बड्या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता!

‘अल्लाह’साठी चित्रपट सृष्टी सोडणाऱ्या सनाने ‘या’ मौलवींशी निकाह केला, व्हिडिओ व्हायरल

भारतीय टीममध्ये निवड न झाल्यानं संतापलेला सुर्यकुमार रोहितसमोर मन मोकळे करत म्हणाला…

सुशांतच्या 17 कोटींचा घोटाळा आणि दिनेश विजयन यांचा संबंध काय? वाचा सविस्तर