मुंबई | मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणात राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ईडीनं अटक केलं होतं. यानंतर त्यांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप नवाब मलिकांवर ठेवण्यात आला आहे. त्यावरून सध्या राज्याचं राजकारण तापलं आहे.
नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपकडून सात्त्याने करण्यात येत होती. त्यानंतर मलिकांचा राजीनामा घेणार का?, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत होता.
विधिमंडळ अधिवेशनात नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी कितीही गोंधळ घातला तरी राजीनामा घेयचा नाही अशी तयारी राष्ट्रवादीने केल्याचं सांगितलं जातंय.
नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता राष्ट्रवादी जयंत पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं पहायला मिळतंय.
बुधवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांनी राज्यातील तक्रारी शरद पवारांसमोर मांडल्या.
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या राजकारणावरून आता महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काळजी घ्या! गेल्या 8 दिवसात 8 पटीने वाढलाय कोरोना; WHO ने दिला ‘हा’ गंभीर इशारा
31 मार्चच्या आधी ‘ही’ 5 कामं आटपून घ्या; नाहीतर मोठं नुकसान होईल
आर्चीचा फोटो पाहून परश्या दिवाना, अशी कमेंट केली की… झाले सगळेच सैराट
नोकरीची सुवर्णसंधी! ‘ही’ प्रसिद्ध IT कंपनी देणार तब्बल 60 हजार भारतीयांना नोकरी
Deltacron: डेल्टाक्राॅनमुळं टेन्शन वाढलं! जाणून घ्या किती धोकादायक आणि काय आहेत लक्षणं?