पाटणा| लग्नात सात वचन घेत आयुष्यभर साथ देण्याचं वचन जोडपं एकमेकांना देत असतं. मात्र खूप कमी जण यावर खरे उतरताना दितात. अशाच काहीशा वचनांचं पालन करत एका वृद्ध महिलेनं आपल्या पतीसाठी प्राण सोडल्याची घटना समोर येत आहे.
बिहारच्या भागलपूरमधील कहलगावात एका वृद्धाचं निधन झालं. या वृद्ध शेतकऱ्याचं वय 100 वर्षे इतकं होतं. पतीच्या निधनाचं वृत्त पत्नीला सहन झालं नाही. वृद्ध पतीच्या मृत्यूची बातमी कळताच 90 वर्षीय पत्नीनेही तिचा प्राण सोडला.
जागेश्वर मंडल यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. सकाळी पतीच्या निधनाची वार्ता समजताच रुक्मिणी देवी यांनी त्यांचे प्राण त्याग केले.
पती जागेश्वर मंडल यांच्या मृत्यूनंतर रुक्मिणी त्यांच्या मृतदेहाजवळ गेली. तिने पतीला घट्ट मिठी मारली. हातात हात घेतला आणि तिनेही जगाचा अखेरचा निरोप घेतला.
दोघंही संपत्तीने गरीब असले तरी मनाने, प्रेमाने श्रीमंत होते दोघांमध्ये प्रचंड प्रेम होतं. कधीही वादविवाद झाला नाही, असं शेजाऱ्यांनी सांगितलं. या घटनेनंतर शेजारील लोक दुःख व्यक्त करत आहे.
महत्वाच्या बातम्या –
काळजाला हेलावून टाकणारी घटना! कोरोनामुळे एकुलत्या एक मुलाचा…
कौतुकास्पद! आई-पत्निचे दागिने गहाण ठेवत पुण्यात उभारलं…
आश्चर्यकारक! 25 वर्षीय ‘या’ महिलेने दिला चक्क नऊ…