महाराष्ट्र Top news पुणे

पुण्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद?, ‘या’ नेत्याचं नाव चर्चेत

nana patole
Photo Credit - Facebook / Nana Patole

पुणे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडण्याची शक्यता असतानाच अधिवेशनाआधी मंत्रिमंडळात फेरबदल होतील, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

काँग्रेसच्या आग्रहावरून हा फेरबदल होणार असून काँग्रेसच्या एका वरिष्ठ मंत्र्याला डच्चू देत त्याजागी नाना पटोले यांची वर्णी लावली जाईल, असं सांगण्यात येत आहे. त्याचवेळी एका राज्यमंत्र्यालाही नारळ दिला जाईल, असं सांगण्यात येत आहे.

पटोले यांच्या हस्ते वेल्हे तालुक्यात आमदार संग्राम थोपटे यांच्या निधीतील विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात पटोले बोलत होते. त्यावेळी त्यांनी संग्राम थोपटे यांच्या बहुचर्चित मंत्रीपदाबाबत भाष्य केलं आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात प्रथम आलेल्या प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी थोपटे यांच्या मंत्रीपदाबाबत भाष्य करत आमदार थोपटे आणि समर्थकांना आनंदाची बातमी दिली.

काहीजण आम्हाला मुंबईत सांगत होते की तुमचे पुणे जिल्ह्यात दोन आमदार आहेत आणि त्या दोघांचे एकमेकांशी पटत नाही. पण आमचे पुरंदरचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष संजय जगताप स्वतः म्हणतात की, तुम्ही संग्राम थोपटे यांना मंत्री करा. त्यामुळे येथे तर कुठेच वाद नाही. पण पुण्यात बाकीचे लोक आपल्यात आग लावण्याचे काम करत आहेत, असं नाना पटोले म्हणालेत.

आमचे आमदार आणि कार्यकर्ते एकच आहेत. आपल्याकडे जे आलबेल आहे, तिकडे आलबेल नाही, असं पटोले म्हणाले.

राष्ट्रवादीकडे आलबेल नसताना ते सर्वकाही व्यवस्थित असल्यासारखे दाखवतात आणि आमच्यात सर्वकाही आलबेल असताना आमच्याकडे तसं नाही, असं दाखवतात, असं सांगत पटोलेंनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, तुम्ही प्रामाणिकपणे काम केल्यास तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही. पुणे जिल्ह्यात मला सर्वात जास्त लक्ष घालावं लागणार आहे, असंही नाना पटोले यावेळी बोलताना म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मोदींनी एकदा दाढी हलवल्यावर 50 लाख घरं पडतात, अन् दुसऱ्यांदा हलवली की…” 

“राष्ट्रवादीचे काही नेते माझ्या पराभवाला जबाबदार” 

मोठी बातमी! नवाब मलिकांना मुंबई उच्च न्यायालयाचा जोरदार झटका 

गुणरत्न सदावर्तेंची शरद पवारांवर बोचरी टीका, म्हणाले… 

“महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांबद्दल एकेरी उल्लेख करता तुमचं कर्तृत्व काय”