आमदार संजय शिरसाट परतीच्या वाटेवर? वाचा काय म्हणाले शिरसाट?

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्याने शिवसेनेचे 40 आमदार, 12 खासदार आणि अनेक आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेची साथ सोडली.

त्यानंंसर सर्वप्रथम शिवसेनेेने सर्वांना भावनिक साद घालून परत येण्याचे आवाहन केले. परंतु बंडोबांचा सुर काही वेगळाच असल्याने शिवसेनेने नंतर त्यांना गद्दार घोषित करुन टाकले.

रक्षाबंधनाच्या (11 ऑगस्ट) दिवशी रोजी मुंबईच्या मावळत्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आपल्याला सोडून गेलेल्या लोकांना बहिणीच्या नात्याने परत येण्याचे आवाहन केले.

आता त्याच पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या बंडात सहभागी झालेले औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे परतीच्या वाटेवर आहेत का? असा प्रश्न निर्माण करणारे एक ट्विट त्यांनी केले आहे.

संजय शिरसाट यांनी आपल्या ट्विटमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा उल्लेख महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून केला आहे. सोबत त्यांनी विधानसभेतील ठाकरेंचे एक भाषण देखील जोडले आहे.

या व्हिडिओत उद्धव ठाकरे आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि दिलेली वचने पूर्ण करतो, असे म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे संजय शिरसाट हे परत शिवसेेनेत दाखल होणार की काय? असा संभ्रम आता निर्माण झाला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नुकत्याच झालेल्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात शिरसाटांना बाजूला सारले गेले. त्यामुळे शिरसाट नाराज आहेत का? त्यांनी कोणते वचन मिळाले होते का?

त्यांच्या या सूचक ट्विटमधून ते कोणाला काही सूचवू ईच्छितात का? अशा एक एक शक्यता आता समोर येत आहेत. आगामी काळात ते काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

“बाबांनो हात जोडून सांगतो, मी पंतप्रधानपदाचा दावेदार नाही…”

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही भूकंप?; ‘या’ दोन नेत्यांमुळे पवारांचं टेंशन वाढलं

गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना मोलाचा सल्ला, म्हणाले…

मोठी बातमी! भाजप प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची लागली वर्णी

‘अरे वा! मग शिवसेना माझीच’, उदयनराजेंचं मोठं वक्तव्य