मुंबई | कोरोना (Corona) महामारीच्या प्रादुर्भावामुळं गेल्या दीड वर्षांपासून सर्वांना मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. अशात आता कोरोनाच्या ओमिक्राॅन (Omicron) या नव्या व्हेरियंटनं सर्वांची चिंता वाढवली आहे.
कोरोना रूग्णसंख्या एकीकडे वाढत असताना आता राज्यातील शाळा महाविद्यालये बंद होणार का? असा सवाल राजेश टोपे यांना विचारला गेला. त्यावर त्यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.
शाळेच्या बाबतीत माझं एवढंच सांगणं आहे की, राज्यातील काही ठिकाणी काही विद्यार्थी कोरोना पाॅझिटीव्ह आढळले आहेत. अहमदनगर यांसारख्या जिल्ह्यात काही विद्यार्थी कोरोना पाॅझिटीव्ह असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
ज्या ठिकाणी रूग्ण आढळले आहेत. त्याठिकाणी जाऊन केस स्टडी करावी लागेल. त्याचं प्राॅपर नियोजन करावं लागेल. लहान मुलांमध्ये कोरोनाचा आजार मोठ्या प्रमाणावर आढळत नाही.
लहान मुलांमध्ये इम्युनिटी चांगल्या प्रकारची असते. त्यामुळे हा आजार त्यांच्यामध्ये बळावत नाही, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
तरीसुद्धा आमचं आरोग्य विभाग आहे. टास्क फोर्स आहे. त्याचबरोबर आयसीएमआर आहे. आयसीएमआरच्या काही गाईडलाईन्स आहेत, त्याचा विचार आम्ही करू, असंही ते म्हणाले.
यासर्वाची मतं घेऊन आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह बैठक घेणार आहोत. त्यावेळी आमची चर्चा होईल आणि दोन दिवसात निर्णय घेऊ, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
शाळांमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे, त्याच दृष्टीने आम्ही विचार करू, असं सुचक वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं आहे. त्यामुळे आता राज्यातील शाळा बंद होण्याची देखील शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
बाप-लेक अडचणीत! नितेश राणेंनंतर आता नारायण राणेंनाही पोलिसांची नोटीस
नितेश राणेंना अटक होणार?; न्यायालयाचा नितेश राणेंना झटका
‘…हा धोक्याचा अलार्म आहे’; लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 500 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना दिलासा
“तुम्ही माझ्यावर दबाव आणू शकत नाही, पत्रातले धमकीवजा शब्द पाहून मी…”