Top news देश मनोरंजन

पतीनंतर आता शिल्पाला देखील अटक होणार? कोट्यवधींच्या फसवणुकीचे प्रकरण भोवणार?

मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पतीला अटक झाल्यापासून शिल्पा शेट्टी देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अशातच आता शिल्पाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

शिल्पा शेट्टी आणि तिची आई यांच्यावर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लखनऊ मधील हसरतगंज पोलीस ठाण्यात ज्योत्सना चौहान आणि रोहीत वीर या दोघांनी शिल्पा आणि तिच्या आईविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी चौकशी करण्यासाठी लखनऊ पोलिसांची टीम मुंबईत दाखल झाली आहे. शिल्पा आणि तिच्या आईविरोधात पोलिसांना पुरावे लागल्यास शिल्पा शेट्टीला अटक होण्याची शक्यता आहे. शिल्पाची काही बँक खाती पोलिसांनी अगोदरंच सील केली आहेत. आता याप्रकरणी पुढे काय होतंय?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या-

कोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं…

हृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ! चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा…

चर्चा तर होणारच! ‘या’ विद्यार्थ्यानं बनवला…

कौतुकास्पद! मोठ्या पगाराची नोकरी सोडून महिला स्मशानात करतेय…