शिंदे गट कमळावर निवडणुका लढणार? वाचा सविस्तर

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केले. त्यामुळे तात्कालीन महाविकास आघाडी सरकार (MVA) कोसळले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले.

एकनाथ शिंदे यांनी आपला गट म्हणजेच खरी शिवसेना असा दावा केला आणि त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगात (Election Commission) शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण आपल्या गटाला मिळावे म्हणून धाव घेतली.

त्याचबरोबर शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या गटातील त्यांच्यासह इतर 15 आमदारांवर असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) आव्हान केले.

सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना विरुद्ध शिंदे गट असे अनेक खटले चालू आहेत. त्यावर आगामी काळात निकाल होणे अपेक्षित आहे. शिंदे यांनी आपल्या गटातील आमदारांसह अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही.

त्यांच्या आगामी भूमिकेबद्दल आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी याबाबत भाष्य केले आहे. ते सध्या बुलाढाणा दौऱ्यावर होते. आगामी निवडणुकांत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार कमळाचेच असतील, असे ते म्हणाले.

भाजपने देखील आगामी निवडणुकांत शिंदे आणि भाजप एकत्रीतपणे युतीत लढणार असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुका महत्वाच्या ठरणार आहेत.

बावनकुळे यांच्या या घोषणेने आता पुन्हा अनेकांच्या भुवया उंचाविल्या आहेत. कारण शिंदे यांच्या गटात गेलेले सेनेचे खासदार प्रताप जाधव (Pratap Jadhav) हे भाजपच्या चिन्हावर निवडून येणार का? असा प्रश्न तयार झाला आहे.

तसेच त्यांनी ज्याप्रमाणे सूर लावला की, बुलढाण्याचा आगामी खासदार हा कमळाचाच असेल. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत शिंदे यांचे खासदार असणार नाहीत का? असा पेच निर्माण झाला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांत मारामारी; नेमके कारण जाणून घ्या

तरुणींच्या धर्मांतरासाठी ‘दरपत्रक’; आमदार नितेश राणेंनी विधानसभेत सादर केली खळबळजनक माहिती

टोलनाके होणार हद्दपार, टोलवसुलीसाठी नितीन गडकरींना आणली आहे नवीन योजना, जाणून घ्या उपयुक्त माहिती

“शरद पवारांना उशिरा कंठ फूटला, त्यांचे आणि राऊतांचे संबंध म्हणजे…”, अतुल भातखळकरांची पवारांवर टीका

एकनाथ शिंदेंनी फडणवीसांच्या मदतीने केली अजित पवारांवर कविता; वाचा सविस्तर कविता