श्रद्धा कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार? वडिल शक्ती कपूर म्हणाले…

मुंबई | बॉलिवूड मधील कलाकार आणि त्यांची रिलेशन्स हा नेहमीच चाहत्यांच्या आवडीचा विषया राहिला आहे. आपल्या आवडत्या कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडतंय, हे जाणून घेण्याची इच्छा चाहत्यांना असते. अभिनेत्री श्रद्धा कपूरचे देखील लाखो चाहते आहेत. तिचे रिलेशन हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.

श्रद्धा गेल्या काही वर्षांपासून रोहन श्रेष्ठासोबत रिलेशनमध्ये आहे. श्रद्धा रोहनसोबतच लवकरंच विवाहबंधनात अडकेल, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. परंतु याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. अशातच आता श्रद्धाचे वडिल शक्ती कपूर यांनी या प्रश्नावर मौन सोडलं आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, रोहन श्रेष्ठा आमच्या कुटुंबाच्या एक जवळचा मित्र आहे. मी त्याच्या वडिलांना ओळखतो. मात्र, आजपर्यंत रोहनने केव्हाच माझ्याकडे श्रद्धाचा हात मागितला नाही. तसेच माझ्या मुलांनी स्वत: आपला जोडीदार शोधल्याचं सांगितलं तर मी आनंदाने सहमती देईल.

सध्या माझ्या मुलांचं वय करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे. लग्न हा एक अतिशय महत्वाचा निर्णय आहे. परंतु लोक ज्याप्रकारे आपल्या नात्याला संपवत आहेत तो एक चिंतेचा विषय आहे. म्हणून लग्न करण्यापूर्वी काळजीपुर्वक विचार केला पाहिजे, असंही शक्ती कपूर यांनी यावेळी म्हटलं आहे.

तसेच यावेळी शक्ती कपूर यांनी इतरही मुद्यांवर आपलं मत मांडलं आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले की, आजच्या काळात आणि आमच्या काळात बराच फरक होता. आता खूप गोष्टी बदलल्या आहेत. आमच्या मुलांना जशा स्क्रिप्ट मिळाल्या तशा आम्हाला मिळाल्या नाहीत.

मी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. माझ्यासाठी कॉमेडियन, व्हॅम्प, व्हिलन आणि लीडसारख्या वेगवेगळ्या भूमिका असायच्या. परंतु आता नायक केव्हा खलनायक पण बनतो, असं देखील शक्ती कपूर यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

शिल्पा आणि राजचं नातं टांगणीला! शिल्पाने घेतला मोठा निर्णय?

भारती सिंग लवकरच आई होणार? माध्यमांशी बोलताना म्हणाली…

सलमान खान एक्स गर्लफ्रेंडसोबत तुर्कीत करतोय मजा?

पियंका चोप्रानं पतीसोबत शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोची सोशल मीडियावर चर्चा, पाहा फोटो

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी