मुंबई | मागील दोन महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटीचं विलिनीकरण व्हावं, या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. अशातच आता एसटी संपाचा (S.T Sump) तिढा काही संपायचं नाव घेत नाहीये.
दिवसागणिक संप चिघळत चालला असून सरकारही संपामुळे चिंतेत आहे. यातच काही आगारांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी अल्टिमेटम दिला होता.
कामावर रुजू न झाल्यास एसटी कर्मचाऱ्यांची आजपासून बडतर्फ करण्यास सुरूवात केली आहे. अशातच याच मुद्द्यावरून सध्या विधानसभेत जोरदार चर्चा रंगल्याचं पहायला मिळालं.
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागणीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार नाही, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
कुणाचंही सरकार असलं तरी ते शक्य नाही, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं आहे. विधानसभेत बोलताना अजित पवारांनी आपली भूमिका मांडली आहे.
एसटी संप मिटविण्यासाठी आम्ही चर्चा केली, सकारात्मक भूमिका घेतली होती. प्रत्येकाने हट्ट केला विलिनीकरण करा, तर ते शक्य नाही, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांना चांगला पगार मिळाला पाहिजे, सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशी आमची भूमिका असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असंही ते म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे. पगार 10 तारखेपर्यंत देण्याची हमी दिली आहे. कधीतरी विलीनीकरण होईल, हे डोक्यातून काढून टाका, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, सरकार आणि त्यांच्या हिताचाच निर्णय आहे. टोकाची भूमिका घेऊन गिरणी कामगारांची वाट लागली, असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
“2 वर्ष झोपा काढल्या का? मी सरकारला पुन्हा एकदा सांगतोय…”
दोन जीव एक शरीर! आई बापानं वाऱ्यावर सोडलं, पण…
“यांना पाहून कुंभकर्णही म्हणेल, रिश्ते में ये हमारा बाप लगता है”
रामदास कदमांचं पुन्हा बंड! अधिवेशनात ठाकरे सरकारला दिला थेट इशारा
“लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”