महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे होणार? शरद पवार म्हणाले…

मुंबई | महाराष्ट्रातील राजकारणात सध्या अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि राज्य सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपाची खेळी सातत्यानं चालूच आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं जात होतं. मात्र, या गोष्टीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साफ नकार दिला आहे.

येत्या १२ डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचं औचित्य साधून लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार यांनी त्याचं उत्तर दिलं आहे.

माझ्या माहितीप्रमाणे सुप्रिया सुळे यांना राज्याच्या राजकारणात रस नाही. त्यांचा रस देशाच्या राजकारणात आहे. त्यांना काही दिवसांपूर्वीच संसदरत्न पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे. प्रत्येकाचा एक इंटरेस्ट असतो यामुळे सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट राज्यातील राजकारणात नसून राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात आहे, असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली होती. चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, भविष्यात जर केव्हा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनवण्याची वेळ आली तर शरद पवार अजित पवारांना नाही तर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा चालू झाली होती. मात्र, या चर्चांना शरद पवार यांनी आता पूर्णविराम दिला आहे.

शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीची सुत्रं तरुण नेतृत्त्वाकडे सोपवली पाहिजेत, असा सूर नेहमीच पहायला मिळतो. याबाबत देखील विजय दर्डा यांनी मुलाखती दरम्यान शरद पवार यांना प्रश्न विचारला होता.

यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादीमध्ये तरुणांचा मोठा संच पहायला मिळतो. या सगळ्यामध्ये मान्य असेल असे अनेक लोक मी सांगू शकतो.

अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे अशा नावांची मालिका मी घेऊ शकतो. आज या पक्षामध्ये असे अनेक लोक नेतृत्व करण्याच्या कुवतीचे आहेत, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्त्व सुप्रिया सुळे यांच्याकडे जाणार की अजित पवार यांच्याकडे जाणार?, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात अनेकदा रंगत असते. मात्र शरद पवार यांनी या नावांच्या पलिकडे काही नावं घेतल्यानं मोठा गौप्यस्फोट झाल्याचं मानलं जातंय.

महत्त्वाच्या बातम्या-

1500 रुपये घेऊन भारतात आले, टांगा चालवला आणि उभं केलं अरबोंचं साम्राज्य

राष्ट्रवादीचं नेतृत्त्व कुणाकडे जाणार?; शरद पवारांची ‘या’ नावांना पसंती

महाविकास आघाडीला मोठा धक्का! धुळे विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपचा ‘हा’ आमदार विजयी

लग्नाच्या कित्येक वर्षानंतर शिल्पाचा धक्कादायक खुलासा! म्हणाली, सलमान रात्री माझ्या घरी यायचा आणि मग…

सुशांत प्रकरणातील रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा; ‘या’ व्यक्तीचा जामीन मंजूर