नवी दिल्ली | भारताला क्रिकेटची महासत्ता म्हणून जगभर ओळखलं जातं. क्रिकेटची जेवढी लोकप्रियता भारतात आहे तेवढी क्वचितच इतर कोेणत्याही देशात आपल्याला पहायला मिळते.
आयसीसीच्या एकूण उत्पन्नाच्या 80 टक्के वाटा हा भारताकडून मिळतो. बीसीसीआयला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणून ओळखण्यात येत असल्यानं भारतीय संघाच्या कामगिरीकडं अवघ्या जगाचं लक्ष असते.
युएईमध्ये नुकतीच टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा पार पडली आहे. भारत या विश्वचषकाचा आयोजक देश होता. भारताला हा मान मिळाला होता पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा इतरत्र ठिकाणी आयोजित करण्यात आली.
आयसीसीनं काही वेळापूर्वी 2030 सालापर्यंत होणाऱ्या जागतिक क्रिकेट स्पर्धांचं वेळपत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन ट्राॅफीचं यजमान पद पाकिस्तानला देण्यात आलं आहे.
पाकिस्तानमध्ये स्पर्धा खेळवण्यात येणार म्हणल्यावर भारताला या स्पर्धेत खेळण्यासाठी पाकिस्तानला जावं लागण्याची शक्यता आहे. परिणामी सध्या आयसीसीच्या या घोषणेमुळं आपल्या देशातील वातावरण पुन्हा भारत-पाकिस्तान सामन्यांबद्दल उत्सुकता वाढली आहे.
गेल्या 25 वर्षांपासून पाकिस्तानात कोणतीही आयसीसीची स्पर्धा झाली नाही. परिणामी पाकिस्तानच्या क्रिकेटवर गंभीर परिणाम होत होते. पाकिस्तानकडून क्रिकेट स्पर्धा खेळवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत होते.
पाकिस्तानमध्ये जर 2025 ची स्पर्धा खेळवण्यात आली तर भारताच्या समावेशाबाबत भारत सरकार काय भूमिका घेणार याची सुद्धा सध्या देशात जोरदार चर्चा आहे.
येणाऱ्या 2024 ते 2031 या कालावधीमध्ये आयसीसीच्या दोन वनडे वर्ल्ड कप, 4 टी-20 वर्ल्ड कप आणि 2 चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धा होणार आहेत. यामध्ये भारतदेखील तीन स्पर्धांचं यजमान पद भूषवणार आहे.
पाकिस्तान आणि भारत सध्या द्विपक्षीय मालिका सुद्धा खेळत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये भारतीय संघ पाकिस्तानात जाणार का?, यावर सध्या देशभर बरीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, भारतानं पाकिस्तानविरूद्ध पाकिस्तानमध्ये खेळून आता बराच कालावधी लोटला आहे. सध्या दोन्ही देशांच्या सरकारनं क्रिकेट स्पर्धा खेळवण्याचा विचार करायला हवा, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मला कळत नाही लोकं दारू का पितात?’; मुख्यमंत्र्यांना पडला प्रश्न
‘शिवाज्ञा! ये रे माझ्या गड्या…’; व्यंगचित्रातून राज ठाकरेंची बाबासाहेब पुरंदरेंना अनोखी आदरांजली
भर आंदोलनात रामदास आठवलेंनी रचल्या कवितेच्या ओळी, म्हणाले…
‘कपडे काढले तरी निर्लज्जांवर परिणाम होत नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
“…म्हणजे पुर्ण बारामती चुकली का?; भाजपचा असला म्हणून काय झालं”