“गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणार आहेत का?”

मुंबई | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळी चांगलीच वाढली आहे. निवडणुकीत सर्व प्रकारचे डावपेच खेळले जात आहेत. तसेच अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

योगी आदित्यनाथ यांचे सरकार हे अंहकारयुक्त सरकार आहे. अहंकार सगळ्यांना एक दिवस संपवून टाकतो. त्यामुळे योगी आणि भाजपला आगामी निवडणुकीत कोणीही मतदार मत देणार नाही, अशी टीका योगींनी केली आहे.

भाजपचे लोक जर म्हणत असतील की आम्ही बहुमताने निवडून येऊ तर त्यांना माझा असा प्रश्न आहे की तुम्हाला मतदान करायला गंगेत वाहून गेलेले मृतदेह येणार आहेत का? कारण जिवंत लोक योगींना आणि भाजपला मत देणं शक्यच नाही, असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.

पंतप्रधान मोदींनी कुंभस्नान केलं आणि नंतर दलितांचे पाय धुतले. आता भाजपचे लोक देखील दलितांच्या घरी जाऊ जेवत आहेत आणि त्यांची सेवा करत आहेत. अशा लोकांच्या डोक्यातून जातीपातीचं राजकारण कधी जाणार, असा मला प्रश्न पडतो. हे सारं भाजपचं ढोंग आहे. केवळ मतदानासाठी हे राजकारण केलं जातंय, असा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला.

आम्हीदेखील निवडणुकीत लढत आहोत. पण परिवर्तन आणायचं असेल तर बिगरभाजप पक्षांनी एकत्रित येऊनच निवडणूक लढवायला हवी, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे.

काही महिन्यात उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक आहे. उत्तर प्रदेशबरोबरच उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरमध्येही निवडणूक होणार आहे.

अशामध्ये ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता या कालावधीत निवडणूक ठेव अधिक घातक ठरु शकतं. निवडणुकीसाठी नेत्यांचे दौरे, प्रचारसभांमध्ये लोकांची उपस्थिती यासारख्या गोष्टींमुळे संसर्गाचा धोका आणखीन वाढू शकतो.

महत्वाच्या बातम्या- 

‘…तर पुण्यात बसने प्रवास करता येणार नाही’; महापालिकेनं घेतला हा मोठा निर्णय 

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; 1 फेब्रुवारीपासून हे नवीन नियम लागू होणार

‘…म्हणून ते हे सगळं करतायेत’; शिवसेना नेत्याने अभिनेता किरण मानेंना फटकारलं 

‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; सरकारने घेतला महत्वाचा निर्णय 

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, आकडेवारीबाबत धक्कादायक माहिती समोर