मोठी बातमी! पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन लागू होणार? उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

पुणे | राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने कडक नियमावली जाहीर केली आहे. तसेच ती नियमावली पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

पुण्यात देखील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळू लागले आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 49 हजार 710 झाली आहे. पुणे शहरात काल तब्बल 3 हजार 286 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांच्या वाढती संख्या लक्षात घेता उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज आढावा बैठक घेतली होती. यावेळी पुणे जिल्ह्यातील अनेक अधिकारी देखील उपस्थीत होते.

या बैठकीनंतर अजित पवार यांनी तुर्तास लॉकडाऊन लागणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, नागरिकांनी जर नियम पाळले नाहीत तर 2 एप्रिलला कठोर निर्णय घ्यावे लागतील, असंही अजित पवारांनी सांगितलं आहे. येत्या 2 आठवड्यात रुग्णांची संख्या कमी झाली नाही तर नाईलाजास्तव लॉकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागेल, असंही पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून देशभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना वि.षाणूचा फैलाव गेल्या काही महिन्यांत कमी झाला होता. मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून देशातील काही राज्यांत कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. देशात कोरोना लसीकरण चालू झालं आहे. कोरोना लस सर्वसामान्यांपर्यंत येऊन पोहोचली आहे. सर्वसामान्यांसाठी लसीकरण सुरू होणं हे दिलासा देणारं आहे.

देशभरातील 10 हजार सरकारी आणि 20 हजार खासगी केंद्रांमधून हे लसीकरण केले जात आहे. सरकारी केंद्रावरील लसीकरण हे पूर्णपणे मोफत आहे. मात्र, खासगी केंद्रावर काही शुल्क घेऊन लस दिली जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक शहरांत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ देशात सोन्याचा डोंगर सापडला अन् सोनं लुटण्यासाठी एकंच झुंबड उडाली; पाहा व्हिडीओ

हा पोपट चक्क कुत्र्याच्या प्रेमात वेडा झालाय! पाहा प्रपोज करतानाचा व्हिडीओ

“पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा”

मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्ड परीक्षेस बसता न येणाऱ्या…

‘देव तारी त्याला कोण मारी’; 12व्या मजल्यावरून…