गृहमंत्री पदाचा राजीनामा देणार का?, अनिल देशमुख म्हणाले…

मुंबई | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक करण्यात आली. यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये चांगलीच आरोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या र.डारवर होते. त्यांच्या अटकेनंतर विरोधी पक्षनेते जास्तच आक्रमक झाल आहेत.

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांकडून वारंवार केली जात आहे. अशातच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आज मी विदर्भातील महत्वपूर्ण अशा मिहान प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मागिल दोन दिवसांत मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि सचिन वाझे यांच्या प्रकरणाविषय एटीएस, एनआयए यांनी केलेल्या तपासाची चर्चा झाली, असल्याचंही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

यासंदर्भात अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी सध्या इलेक्ट्रोनिक मिडीयावर माझ्या राजीनाम्याच्या ज्या बातम्या दाखवण्यात आल्या आहेत त्यात कोणतेही तथ्य नाही, असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राजीनामाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्या प्रकरणावरुन भाजपचे नेते नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

तसेच विरधीपक्षाकडून सारखी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. आताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ही मागणी केली आहे.

त्यासंदर्भात रामदास आठवले यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्रात अशा घटना घडणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मी रिपबल्किन पार्टी ऑफ इंडियाकडून मागणी करतो की, महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.  तसेच त्यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रही पाठवत असल्याचं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-