मराठवाड्यात मनसे इतक्या जागांवर विधानसभा लढणार??

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मनसेच्या ज्येष्ठ नेत्यांची गेल्या आठवड्यात मुंबईत बैठक झाली. त्यात राज्यभरातील जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्ष उपस्थित होते. विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

मराठवाड्यात मनसे निवडणूक लढवणार आहे, हे आता निश्चित झाले आहे. मराठवाड्यातील किती जागा लढवायच्या याबाबत मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली.

मराठवाड्यातील 48 जागांपैकी 32 जागा लढवण्यासाठीचा प्रस्ताव मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमोर ठेवला जाणार असल्याचे सुमित खांबेकर यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत मनसे नाशिकमध्ये 15 पैकी 15 जागा लढणार असल्याची माहिती मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी दिली आहे. अभिजीत पानसे आणि संदीप देशपांडे यांच्या उपस्तीतीत नाशिकमध्ये मनसे कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांच्या बैठक पार पडली.

नाशिकच्या 15 विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी सर्वच्या सर्व जागा लढण्याचा आग्रह धरला असून या सर्व जागा वर उमेदवार दिले जातील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-