महाराष्ट्रात आज लॅाकडाऊन होणार?, मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई | राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असून ही आकडेवारी धडकी भरवणारी आहे. त्यामुळे राज्यात आता कठोर निर्बंध लावण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात मिनी लॉकडाऊन लावण्याचीही चर्चा होत आहे.

कोरोना बाधितांच्या आकडेवारीला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून वेळीच निर्बंध लावणं आवश्यक आहे. त्याच संदर्भात सकाळी नऊ वाजता मंत्रालयात एका बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत इतर मंत्री, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत राज्यातील मनुष्यबळ, केंद्राची मदत, राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय निर्णय घ्यायचा यावरदेखील चर्चा होणार आहे. आज (बुधवारी) होणाऱ्या या बैठकीनंतर जो काही निर्णय घेण्यात येईल त्यासाठी अंतिम मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्यात सध्या तरी लॉकडाऊन लावण्यात येणार नसून निर्बंध कडक करण्यात येतील, असं आरोग्यमंत्र्यांनी जरी स्पष्ट केलं असलं तरी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे.

जगभरातच ओमिक्रॉनच्या (Omicron) संकटाचे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत. राज्यातील ओमिक्रॉन (Omicron) बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. काल (मंगळवारी) राज्यात ओमिक्रॉनच्या आणखी 75 रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात सापडेलल्या रुग्णांपैकी 40 रुग्ण मुंबईतील, 9 रुग्ण ठाणे मनपा, 8 रुग्ण पुणे मनपा, 5 रुग्ण पनवेल, नागपूर आणि कोल्हापुरात प्रत्येकी तीन रुग्ण, पिंपरी-चिंचवडमध्ये दोन तर भिवंडी निजामपूर, उल्हासनगर, सातारा, अमरावती आणि नवी मुंबईत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात ओमिक्रॉनच्या 653 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 259 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 18 हजार 466 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील  काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे.

आज रुग्णसंख्येने अठरा हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

महत्वाच्या बातम्या-

हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवता होती- उद्धव ठाकरे 

उपेक्षितांसाठी सिंधुताईंचं काम खूप मोठं, त्यांच्या निधनामुळे दु:ख झालं- नरेंद्र मोदी 

‘कोरोनाची तिसरी लाट आली तर…’, आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिला गंभीर इशारा 

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! राज्याची आकडेवारी 18 हजाराच्या पार

महाराष्ट्र पोरका झाला! सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन