मुंबई | सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाला आहे. कोरोना रूग्णसंख्येत अचानकपणे झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत.
कोरोनानं गेल्या दीड वर्षात मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. अनेक क्षेत्रांमध्ये कोरोनानं मंदी आणली आहे. अशात आता काही प्रमाणात परिस्थिती चांगली झाली, असं वाटत असताना अचानक रूग्णसंख्या वाढली आहे.
काही दिवसांपूर्वी ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत वाढ होत होती. आता कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत सरकार विविध निर्बंध लावण्याचा विचार करत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेत पवार यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर उत्तर दिली आहेत.
मास्क न घातल्यास 500 रुपये दंड आणि मास्क नसताना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारण्याचा निर्णय आज पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत घेण्यात आला असून 5 जानेवारी 2022 पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
आठवडाभरात पुण्यात वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रत्यक्ष सुरु असलेल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात सरकारनं राज्यभर नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली होती. त्यांनतर आता राज्यातील शाळा हळूहळू बंद होताना दिसत आहेत.
राज्याची राजधानी मुंबईमधील शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. त्यांनतर लागलीच पुण्यातील शाळा देखील बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
लसीकरणाचा वेग वाढवण्याबरोबर अजित पवार यांनी दुसरा डोस न घेणाऱ्याना चांगलाच दम दिला आहे. कोरोनाची परिस्थिती पहाता दुसरा डोस घेतला नाही तर आम्ही कठोर निर्णय घेऊ असं पवार म्हणाले आहेत.
मास्क नसेल तर आता 500 रूपये दंड आकारण्यात येणार आहे. परिणामी नागरिकांना मास्कचा वापर करावा, असं अजित पवार म्हणाले आहेत. नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घेण्याची गरज पवार यांनी बोलून दाखवली आहे.
दरम्यान, सर्वत्र सध्या लाॅकडऊनच्या चर्चा असल्या तरी सरकार होईल तितकी परिस्थिती लाॅकडाऊन न करता नियंत्रणात आणण्याचा विचार करत आहे. परिणामी नागरिकांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या-
…अन् जितेंद्र आव्हाड भाजप आमदाराला म्हणाले, “साॅरी, साॅरी, साॅरी, साॅरी”
पुन्हा शिवसेना-भाजप एकत्र येणार?; शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य
जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पवार संतापले, म्हणाले…
पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवारांचं वर्चस्व; विजयानंतर म्हणाले, “मला डाऊट होताच तिथं…”
पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या महिलेसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार!