राज्यात ओमिक्राॅनची तिसरी लाट येणार?; रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय वाढ

मुंबई | कोरोनाचा व्हेरियंट ओमिक्राॅननं जगभर कहर माजवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली असून वाढती रुग्णसंख्या पाहता निर्बंधही कडक करण्यात आले आहेत.

ओमिक्राॅन या नव्या व्हेरियंटचा वाढता संसर्ग पाहता आणि वाढती रुग्णसंख्या पाहता तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

राज्यात ओमिक्राॅनची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. कट्या पुण्यातच गेल्या 24 तासांत 197 ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. तर मुंबईत आतापर्यंत एकूण सहाशेहून अधिक ओमिक्रॉनबाधित रुग्ण आहेत.

लसीकरण झालेले असूनही नागरिकांना कोरोनाची आणि ओमिक्राॅनची बाधा होत असल्याचं चित्र आहेे. त्यामुळे आता खासगी रुग्णालयात बुस्टर डोस (Booster Dose) देण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,

डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरियंट धोकादायक असून त्यांच्यामुळे रुग्णसंख्या नवे रेकॉर्ड नोंदवत असून रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृत्यूंचं प्रमाणही वाढत आहे.

ओमिक्राॅन व्हेरियंट अतिशय धोकादायक आहे. विशेषत: ज्यांनी अजून लस घेतली नाही त्यांच्यासाठी हा धोकादायक ठरेल. ओमिक्रॉनमुळे जगभरात प्रकरणं वाढत चालली आहेत.

कोरोना प्रतिबंधक लस कोरोना आणि मृत्यूच्या गंभीर प्रकरणांपासून संरक्षण करते. परंतु संसर्गाचा प्रसार पूर्णपणे थांबवत नाही. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती झाली आहे.

कोरोनाच्या लक्षणांमध्ये आणि ओमिक्राॅनच्या लक्षणांमध्ये बरीच तफावत जाणवत आहे. त्यामुळे ओमिक्राॅनची लागण झाल्याचं लगेच जमजत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; सरकारकडून मिळणार खास गिफ्ट

 IPL 2022: मेगा ऑक्शनपूर्वी ‘या’ 3 खेळाडूंना मिळू शकते लखनऊमध्ये डायरेक्ट एन्ट्री

CDS जनरल बिपीन रावत यांच्या अपघाताबद्दल ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

प्रसिद्ध काॅमेडियन भारती सिंहने सोडली मुंबई; समोर आलं ‘हे’ कारण

 ‘माझं 67 लाख घेतलं…’, पोलीस चौकी गाठत नेता ढसाढसा रडला; पाहा व्हिडीओ